गडचिरोली,दि.२२: ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, या मुख्य मागणीसह विविध मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने आज २१ जानेवारी रोजी जिल्हाभरात धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघ तसेच ओबीसींच्या जात संघटनांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला होता.
१९३१ साली इंग्रज सरकारने ओबीसी हा ५२ टक्के आहे असे जाहीर केले होते. परंतु भारत देशाच्या स्वातंत्र्यानंतरही ओबीसी समाजाची गणना होत नसल्याने ओबीसी समाजाला संख्याच्या प्रमाणात आरक्षण नाही आणि कुठल्याही क्षेत्रात ओबीसींना वाटा नाही. यामुळे महाराष्ट्र राज्याबरोबर गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा ओबीसींची सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीत दिवसेंदिवस खालावत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात ओबीसींना केवळ ६ टक्के आरक्षण ओबीसी समाजात बेरोजगारी, दारिद्रय़, शेतकर्यांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत. पेसा कायद्यामुळे नोकरी भरतीत ओबीसींना नगण्य स्थान आहे. ओबीसी समाजाची जगनगणा झाली तर ओबीसी समाजाचे ९0 टक्के प्रश्न सुटतील असा विश्वास संपूर्ण भारत देशातून ओबीसी समाज व्यक्त केरीत आहेत. त्यामुळे स्वतंत्र ओबीसींची जनगणना करण्यात यावी, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली.गडचिरोली येथील धरणे आंदोलनात राष्ट्रीय उपाध्यक्ष शेषराव येलेकर, जिल्हाध्यक्ष दादाराव चुधरी, कार्याध्यक्ष विनायक बांदुरकर, उपाध्यक्ष पांडुरंग घोटेक, सचिव देवानंद कामडी, हेमंत जम्बेवार, संजय चुधरी, कल्पना चौधरी, रूचित वांढरे, नारायण म्हस्के, घनश्याम दिवटे, रिपब्लिकन फोरमचे रोहिदास राऊत यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
चामोर्शी – सरकारने २0२१ मध्ये होणार्या जनगणनेमध्ये ओबीसी स्तंथ असलाच पाहिजे व स्वतंत्र जनगणना व्हावी, यासाठी तहसील कार्यालयासमोर आज राष्ट्रीय ओबीसी महासंघ व तसेच विविध संघटनांच्यावतीने धरणे आंदोलन करून नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डी. एम. हिरादेवे, संघटक एन. एस. बोरकुटे, उपाध्यक्ष आनंदराव खरबनकर, चामोर्शी ओबीसी संघाचे अध्यक्ष गोकुळ झाडे, उपाध्यक्ष सुनिल कावळे, सचिव दीपक सोमनकर, कोषाध्यक्ष खुशाल कापगते, मार्गदर्शक परशुराम सातार, अँड. खेमाजी सातपुते, प्रभाकर गव्हारे, मारोती दुधबावरे, सुभाष कोठारे, आशिष पिपरे, बाळुजी दहेलकर, श्याम रामटेके, विनोद खोबे, संजय म्हस्के, पुष्पा कोठारे, सीमा खोबे, विशाखा गोटेफोडे, कविता झाडे, वंदना म्हस्के, अल्का दुधबळे, वनिता पंचकुलीवार, मंगला कोहळे, शिला नाकाडे, कविता किरमे, कविता बारसागडे, चंचल गव्हारे, स्वेता पिपरे, सुनिता वासेकर, ममता चुधरी, राधिका खरवडे, संध्या चिनारकर, भाग्यवान पिपरे, हिराजी गोहणे, पोपेश्वर लडके, अतुल येलमुले, साहेबराव घागरे यांच्यासहे ओबीसी समाज संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
देसाईगंज- २0२0-२१ मध्ये होणारी जनगणना जात निहाय व्हावी व जनगणना प्रपत्रात ओबीसी प्रवगार्चा स्वतंत्र रकाना असावा या मागणीसाठी आज देसाईगंज येथील राष्ट्रीय ओबिसी महासंघाच्या उपविभागीय अधिकार्यामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदन देतेवेळी राष्ट्रीय ओबिसी महासंघ तालुका अध्यक्ष लोकमान्य बरडे, पंचायत समितीच्या उपसभापती शेवंताबाई अवसरे, पंचायत समिती सदस्या अर्चना ढोरे, धनपाल मिसार, परसराम टिकले, मुरलीधर सुंदरकर, सावंगीचे सरपंच राजेंद्र बुल्ले, चक्रधर पारधी, शंकर पारधी, ज्ञानेश्वर पिलारे,पंकज धोटे, सागर वाढई, मुरारी कुथे, सतीश खरकाटे, शहजाद शेख, विलास बन्सोड,विलास ठाकरे, मातेरे, पिलारे यांच्यासह बहुसंख्य ओबिसी बांधव उपस्थित होते.
आरमोरी – देशाच्या २0२१ च्या जनगणनेत ओबीसीचा कालम तयार करून स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या राज्यव्यापी कार्यक्रमानुसार तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात ओबीसी महासंघाचे तालुकाध्यक्ष चेतन भोयर, प्रवीण ठेंगरी, अमोल ढोंगे, गोलू ठेंगरी, प्रा. मनीष राऊत, मनोज पांचलवार, मजुंषा दोनाडकर, राहूल जुआरे, प्रफुल खापरे, जि.प. सदस्या मनिषा दोनाडकर, नगरसेवक मिलींद खोब्रागडे, डॉ. महेश कोपूलवार, महेंद्र शेंडे, वामन राऊत, दिवाकर पोफोडे, जितेंद्र ठाकरे, नगरसेविका लोणारे, अमोल मारकवार, विनोद झोडगे, रोहीत बावणकर, अजय कुथे, संदीप राऊतत, अक्षय बोरकर, रमेश कोरचा, मिथून शेबे, दिलीप घोडाम, रूमदेव सहारे, अमोल दहीकार, यादव दहीकार यांच्यासह ओबीसी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.




