38 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ समाजाला एकत्र होण्याची गरज – माधुरी भेलावे

समाजाला एकत्र होण्याची गरज – माधुरी भेलावे

0
30

गोंदिया,दि..२२: आजच्या धकाधकीच्या जीवनात कुणालीही कुणासाठी वेळ राहिलेला नाही. यामुळे मात्र आपसांतील आपुलकी व प्रेम कामी होत चालले असून एकटेपणा वाढत आहे. अशात प्रगती शक्य नसून सर्वांनी मिळून राहिल्यास पुढे वाढता येते. करिता काळानुरुप सामाजाला एकत्र होण्याची व सामाजिक एकोपा जोपासण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माधुरी भेलावे यांनी केले.
आदर्श तेली समाज सेवा समिती महिला मंचच्यावतीने तेलघनी मंगल कार्यालयात आयोजित महिला मेळाव्यात अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. महिला मेळावाचे निमित्त साधून हळदीकुंकू कार्यक्रम, आरोग्य मार्गदर्शन शिबिर तथा विविध रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
उद््घाटन स्मिता हटवार, मालती कापसे, पारबता घारपिंडे डॉ.अपर्णा खोब्रागडे तर दीप प्रज्ज्वलन यामिनी धुर्वे, वीना कापसे, डॉ.सौ. सुवर्णा हुबेकर, आशा पाटीला, उषा, तुळसकर, पुष्पा वंजारी यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात स्नेहलश्री संजय साठवणे यांनी गायलेल्या दिपगीताने करण्यात आली. याप्रसंगी डॉ.खोब्रागडे यांनी, मुली व महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्श केले. डॉ.सुवर्णा हुबेकर यांनी, महिला मेळावा अंतर्गत समाज जागृतीसह महिलांना आरोग्याविषयक मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, पाहुण्यांच्या हस्ते उपवर वधू परिचय कार्यक्रमाच्या प्रथमच प्रकाशित करण्यात आलेल्या ‘शुभ मांगल्यम’ या पुस्तिकेच्या प्रथम आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.
संचालन किर्ती सोमेश्‍वर वंजारी यांनी केले. आभार सिंधू महेंद्र मोटघरे यांनी मानले. कार्यक्रमासाच्या यशस्वितेसाठी सुनीता वैद्य, प्रिती पाटील, शारदा समरित, गायत्री, सुहानी पाटील, मोना बडवाईक, कीर्ती, वंजारी, वीणा भेलावे, धनेश्‍वरी कुंभलकर, रीना भोंगाडे, साधना बालपांडे यांच्यासह समिती सदस्यांनी सहकार्य केले.