39.9 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home विदर्भ 1901,1948 व इतर लेखाशिर्षातील कर्मचाऱ्यांचे वेतन उणे मधून काढा-आ.प्रा.श्रीकांत देशपांडे

1901,1948 व इतर लेखाशिर्षातील कर्मचाऱ्यांचे वेतन उणे मधून काढा-आ.प्रा.श्रीकांत देशपांडे

0
53

अंजनसिंगी,दि.23:- शिक्षण विभागाच्या योजनेतर्गत असलेले लेखाशीर्ष 1901, 1948 व इतर या लेखाशीर्ष योजनेनंतर कर्मचार्यांचे पगार उणे प्राधिकरणातून काढण्यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार प्रा.श्रीकांत देशपांडे यांनी संबधित अधिकारी व आदिवासी विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
आदिवासी विकास विभाग शिक्षण विभागाला आदिवासी उपयोजना क्षेत्रात असलेल्या विद्यालयाच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदान देते. हे अनुदान उपरोक्त लेखाशीर्षतर्गत देण्यात येते.योजना अंतर्गत सदर लेखाशीर्ष असल्यामुळे अनुदान नसल्यास 3/3 महिने पगार होत नाहीत. नोव्हेंबर 2019 पासून या लेखाशीर्षचे पगार थांबलेले आहेत. हे लेखाशीर्ष बांधील खर्च असल्यामुळे योजनेतर कारणासाठी शिक्षण विभागाकडून तात्काळ प्रस्ताव मागविण्यात यावे असेही आमदार श्रीकांत देशपांडे यांनी म्हटले आहे.तसेच हा बांधील खर्च असल्यामुळे उणे प्राधिकरनातून जेव्हा जेव्हा निधी नसेल तेव्हा तेव्हा देयके मंजूर करण्यात बाबतचे आदेश शिक्षण विभागाकडून प्रस्ताव मागून वित्त विभागाच्या संमती तात्काळ निर्गमित करण्यात यावेत असे आमदार देशपांडे यांनी आदिवासी विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांच्यांशी चर्चा करतांना सांगितले.