गोंदिया,दि.२३ः- गोरेगाव तालुक्यातील तुमसर येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेची अवमानना करणाèया समाजकंटकाला गोरेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून आज न्यायालयात हजर केल्यानंतर २४ जानेवारीपर्यंतची पोलीस कोठडी मिळवली आहे.१०-११ जानेवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास प्रतिमेची विटबंना करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता.त्यानुसार मुख्याध्यापकांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात करुन पोलीस उपनिरिक्षक कुलदिप नागोसे हे तपास करीत होते.तपासादरम्यान गावातील बहुतांश नागरीकांकडून माहिती घेत चौकशी करण्यात आली.त्यानंतरही शोध न लागल्याने गोपनीय माहितीकरीता पेटी ठेवण्यात आली.गोपनीय माहितीच्या आधारे साक्षीदाराची चौकशी केली असता दिपक रामेश्वर ढोमने(वय १९)रा.तुमसर याचे नाव समोर येताच त्याला ताब्यात घेत आज न्यायालयात हजर करण्यात आले.अधिक तपासासाठी पोलीस कोठडी मागण्यात आल्याने न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली.उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनात सहा.पोलीस निरिक्षक सचिन थोरात व त्यांचे पथक अधिक तपास करीत आहेत.




