36.5 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home गुन्हेवार्ता टायर फुटल्याने प्रवासी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात

टायर फुटल्याने प्रवासी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात

0
30

देवरी : तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील मुरदोली शिवारात धावत्या ट्रॅव्हल्सचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन अपघातग्रस्त झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे. ही घटना (ता. २१) सायंकाळी ६ वाजता सुमारासची आहे.
सविस्तर असे की, प्रवासी ट्रॅव्हल्स बस रायपूरहून नागपूरच्या दिशेने २१ प्रवासी घेवून प्रवास करत होती. प्रवासादरम्यान शिवाराजवळ मुरदोली ट्रॅव्हल्सचा समोरील टायर अचानक फुटला, ज्यामुळे वाहन अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला गेले. चालकाच्या प्रसंगवधानाने वाहन अधिक गंभीर अपघातापासून वाचले. या अपघातात ट्रॅव्हल्स चालक जखमी झाला असून त्याला रुग्णवाहिकेच्या साहाय्याने ग्रामीण रुग्णालय, देवरी येथे दाखल करण्यात आले आहे. तर वाहनातील सर्व २१ प्रवासी पूर्णपणे सुरक्षित असून त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच देवरी पोलीसानी घटनास्थळ गाठून पंचनामा सुरू केला.