गोंदिया,दि.२३ः-परदेशी बढई समाज सेवाभावी संस्थेच्यावतीने सरस्वती शिशुमंदीर एकतानगरच्या प्रांगणात समाजातील जेष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा व महिलांच्या हळदीकुंकु कार्यक्रमाचे आयोजन रविवारला करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरवात भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेची पुजाअर्चंना करुन करण्यात आली.यावेळी महिला अध्यक्ष आशा नागपूरे,समाज अध्यक्ष ताराचंद बिल्लोरे,सचिव उमाकांत सरोदे,उपाध्यक्ष डॉ.प्रकाश नागपूरे,कोषाध्यक्ष राजेश जांगडे,संस्थेचे संस्थापक सदस्य रमेश नागपूरे,गणेश जांगडे,महिला सचिव गणु बकलाते,आशा जांगडे,तारा जांगडे उपस्थित होते.यावेळी समाजातील मुलामुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.तसेच महिलांचा मेळावा पार पडला.यावेळी डोंगरगाव(मोहाडी)येथील समाजाच्या दिव्यांग मुलीने परिस्थितीवर मात करुन पुणे येथे बोटींगचे प्रशिक्षण घेतले असून तिने कोरीया येथील सेऊल मध्ये आयोजित स्पर्धेत भाग घेत कांस्यपदक qजकल्याबद्दल तिचे शाल,,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले.आयोजनासाठी ताराचंद बिल्लोरे,स्नेहा जांगडे,प्रिती जांगडेआqदनी सहकार्य केले.




