36.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे धरणे आंदोलन

राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे धरणे आंदोलन

0
92

भंडारा,दि.24ः-राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना, महाराष्ट्र या संघटनेच्या सभासदांचे प्रलंबीत मागण्यांसंदर्भात दि. २३ जानेवारी रोजी राज्य परिवहन विभागीय कार्यालय भंडारा येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. राज्य परिवहन कर्मचाèयांच्या मागण्यांबाबत दि. १८ नोहेंबर २०१९ रोजी एक दिवसीय धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. परंतू त्या दिवशी अयोध्या राम जन्मभूमीबाबत निर्णय अलीकडच्या काळात होण्याच्या श्नयतेमुळे राज्यात सरकााी यंत्रणेने अलर्ट जारी केल्यामुळे आणिबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा विचार करून दि. १८ नोहेंबर रोजी सर्व विभागामध्ये विभागीय कार्यालयांसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला होता.दि. १५ डिसेंबर २०१९ रोजी नाशिक येथे झालेल्या केंद्रिय कार्यकारीणीच्या बैठकीत स्थगित केलेले एक दिवसाचे धरणे आंदोलन दि. २३ जानेवारी रोजी राज्यातील सर्व विभागीय कार्यालयासमोर करण्यात आले. भंडारा येथे सुद्धा कर्मचाèयांची आंदोलनात सहभागी होत आपल्या प्रलंबीत मागण्या मंजूर करण्याची मागणी केली. यावेळी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना, महाराष्ट्र या संघटनेचे सरचिटणीस स.य. विचारे, संघटनमंत्री के.ई. कडव, कोषाध्यक्ष एम. बी. नायडू, सचिव एल.एम. रंगारी भंडारा, भगीरथ धोटे व भंडारा जिल्हयातील संघटनेचे सभासद मोठया संख्येने सहभागी झाले होते.