गडचिरोली,दि.24ःभाजपा प्रदेश कमिटीच्यावतीने २१ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या कोर बैठकीत गडचिरोली शहर अध्यक्षपदी नगरसेवक मुक्तेश्वर काटवे यांची नियुक्ती करण्यात आल्याचीमाहिती विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांना दिली.
भाजपा शहराध्यक्ष पदाच्या नियुक्तीसाठी १८ जानेवारी रोजी शहरातील सर्व बुथ प्रमुख, सक्रीय कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत शहर अध्यक्ष पदासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामधून १७ उमेदवारांच्या नावांची यादी पुढे आली. या उमेदवारांची जिल्हा कोर बैठकीत पदाधिर्यांशीचर्चा करून मुलाखत घेण्यात आली. यामध्ये १७ उमेदवारांमधून ११ उमेदवारांनी मुक्तेश्वर काटवे यांच्यासाठी आपली उमेदवारी मागे घेतली. तर न.प.चे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांच्यासाठी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले व १ उमेदवार तटस्थ राहीला. शहराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार उभे राहील्याने जिल्हा कोर कमिटीमध्ये निर्णय घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे नगरसेवक मुक्तेश्वर काटवे व न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर या दोन्ही उमेदवारांची नावे प्रदेश कमिटीकडे पाठविण्यात आले. कमिटीने पाठविलेल्या दोन्ही उमेदवारांच्या नावांवर गडचिरोली शहराध्यक्षपदी नगरसेवक मुक्तेश्वर काटवे यांची निवड करण्यात आली. तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांनी नवनियुक्त शहराध्यक्षांची घोषणा करावे, असेही सांगण्यात आले. त्यामुळे भाजपा जिल्हाध्यक्षांनी नवनियुक्त शहराध्यक्षांच्या घोषणेची जबाबदारी आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडे सोपवली.
मुक्तेश्वर काटवे यांच्या नियुक्तीची घोषणा आज २३ जानेवारी रोजीआ. डॉ.देवराव होळी यांनी केली. यावेळी नगराध्यक्षा योगिता पिपरे, नगरसेवक रमेश भुरसे, प्रमोद पिपरे, केशव निंबोड, प्रशांत खोब्रागडे, सभापती वषार्ताई बट्टे,पल्लवी बारापात्रे, वैष्णवी नैताम, लताताई लाटकर, विना उंदीरवाडे, शहर महामंत्री विनोद देवोजावर, जनार्धन साखरे, देवाजी लाटकर, वासुदेव बट्टे, शाम वाढई, गजेंद्र मेर्शाम,पुरुषोत्तम बांबोळे, जनार्धन भांडेकर, राकेशरचमलवार,पद्माकर पिपरे, मनोहर भांडेकर, गोलू नैताम, निलीमा राऊत, दुर्गा मंगर,पुष्पा करकाडे व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.





