39.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ कुशल कामाचे देयक त्वरित द्या-आ.चंद्रिकापुरे

कुशल कामाचे देयक त्वरित द्या-आ.चंद्रिकापुरे

0
49

सडक अर्जुनी,दि.24ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत जिल्ह्यात करण्यात आलेल्या कामांची देयक थकली आहेत. यासाठी मागील अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू आहे. तर देयक प्रलंबित असल्याने
ग्राम पंचायतींची विकासकामे प्रभावित झाली आहे.या बाबीची दखल घेत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी राज्याचे रोजगार हमी मंत्री ना.संदिपानराव भुमरे यांची भेट
घेवून सविस्तर चर्चा केली. दरम्यान कुशल कामांचे देयके त्वरित काढण्यात यावी, अशी मागणी केली.शासनाची महत्वाकांक्षी योजना म्हणून मग्रारोहयो ओळखली जाते. या योजनेच्या माध्यमातून गावातच
नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिले जाते. योजनेअंतर्गत कुशल व अकुशल अशी कामे घेण्यात येतात. मात्र, गोंदिया जिल्ह्यातील ४०० ग्राम पंचायतीचे मागील ३ वर्षापासून कुशल कामाचे सुमारे
१८ कोटी रू.शासनाकडून मिळाले नाही. त्यामुळे ग्राम पंचायतीवर आर्थिक संकट कोसळले आहे.त्यामुळे रोजगार हमी योजना मंत्री संदिपानराव भुमरे यांची आ.मनोहर चंद्रिकापुरे यांनी भेट घेऊन कुशल
कामाचा निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. यावर ना.संदिपानराव भुमरे यांनी आ.चंद्रिकापुरे यांना आश्वासित करीत तत्काळ यावर कार्यवाही करून कुशल कामाचा निधी संबधित ग्राम
पंचायतींना वितरीत करण्यात येणार, अशी ग्वाही दिली. या संदर्भात नागपूर विभागात तातडीने बैठक आयोजित करण्याचे निर्देशही अधिकाNयांना दिले.