39.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ पालकमंत्र्यांच्या हस्ते 26 जानेवारीला शिवभोजन केंद्राचे उद्घाटन

पालकमंत्र्यांच्या हस्ते 26 जानेवारीला शिवभोजन केंद्राचे उद्घाटन

0
44

गोंदिया ,दि.25 : गरीब व गरजू व्यक्तींना 10 रुपयात शिवभोजन उपलब्ध करुन देण्यासाठी शिवभोजन केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11 वाजता प्रताप क्लब कॅन्टीन, सिव्हील लाईन, गोंदिया येथे संपन्‍न होत आहे. कार्यक्रमास जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, खासदार सर्वश्री प्रफुल पटेल, अशोक नेते व सुनिल मेंढे, आमदार सर्वश्री विनोद अग्रवाल, डॉ.परिणय फुके, विजय रहांगडाले, मनोहर चंद्रिकापुरे, सहसराम कोरोटे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.जिल्ह्यात 200 थाळीचे उद्दिष्ट असून गोंदिया शहरात प्रताप क्लब कॅन्टीन, सिव्हील लाईन व माँ शारदा रेस्टारेंट रेलटोली, गोंदिया येथे गरीब व गरजू व्यक्तींना दुपारी 12 ते 2 या वेळेत 10 रुपयात शिव थाली उपलब्ध होणार असून गरजू व गरीब व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.