36.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेत कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत जनजागृती करा – डॉ.राजा दयानिधी

प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेत कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत जनजागृती करा – डॉ.राजा दयानिधी

0
52

 गोंदिया,दि.25 : जिल्ह्यात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमीत्त प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रत्येक ग्रामसभेत आरोग्य विभागामार्फत कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत जनजागृती करावी. अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत दिल्या.जिल्ह्यात 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2020 या दरम्यान कुष्ठरोग व क्षयरोग निर्मुलनासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भुषणकुमार रामटेके व या मोहिमेची सविस्तर माहिती सहायक संचालक (कुष्ठरोग) तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.आर.जे.पराडकर यांनी दिली.

सभेला अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, माता व बाल संगोपन अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.चांदेकर, डॉ.नितीन कापसे, डॉ.चौरागडे, डॉ.निरंजन अग्रवाल तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा कार्यक्रम समन्वयक धनेंद्र कटरे, जिल्हा पीपीएम समन्वयक प्रज्ञा कांबळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे व सां.सहायक (कुष्ठरोग) श्री.राठोड उपस्थित होते.या बैठकीत मोहिम कशी राबविण्यात येणार आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या ग्रामसभेत जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाचे वाचन, कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत प्रतिज्ञा वाचन, ग्रामस्थांना माहिती देणे, प्रश्नोत्तर करणे आदीचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच पंधरवाड्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, आश्रमशाळा, खाजगी शाळा, आंगणवाडी येथे जनजागृती करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.