गोरेगाव,दि.31ःस्थानिक किरसान मिशन स्कूल व जुनिअर कॉलेज गोरेगाव इथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. ह्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विंनोद उके होते.
महात्मा गांधी यांनी शिक्षणाच्या माध्यमाने चांगले चरित्रवान, सदाचारी व सत्याची जाण ठेवणारे व्यक्ती निर्माण झाले पाहिजे व असे व्यक्ती राष्ट्राचे भवितव्य साकार करतील असे म्हटले होते म्हणून आजचा विद्यार्थी सदाचारी, अहिंसा पाळणारा व सत्याची कास धरणारा असावा. आजच्या पिढीला महात्मा गांधीजींच्या आदर्शावर चालने अंत्यत आवश्यक आहे. त्यामुळे आपले जीवन सफल होऊ शकते. आपसातील वैर, घूर्णा, वाईट विचार, बदला, यामुळे आपसातील संबंध समाजात विस्कळीत झालेले आहेत. त्यामुळे महात्मा गांधीजींच्या आदर्शावर चालने एकमेव पर्याय आहे.
यावेळी पी. डी. रहांगडाले, लक्ष्मी चौरेशिया, पुष्पलता सोनवणे, माधुरी गोदुले, गोदावरी डोहळे, ज्ञानेशोरी पटले, सुनील रहांगडाले, मीरा साठवणे, सरिता चिपे, माधुरी बघेले, मंगला जांभुळकर, ममता चौधरी, छाया हरिणखेडे, गीता जागणित प्रमोद रहांगडाले, केशव मेर्शाम, कुणाल बोरकर, काजल बोरकर, गणेश चौधरी, खिलेश सोनवणे, हर्षा ठाकरे, माईकल सिहारे, आर. आर. कटरे, सचिन रामटेके, धर्मेंद्र राऊत, उपस्थित होते.





