गोंदिया,दि.31ःक्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून मोठय़ा भावाची हत्या करणार्या लहान भावाला पोलिसांनी घटनेनंतर एका तासात अटक केली. ही घटना २९ जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास खमारी येथे घडली. गणेश बुधराम मेंढे असे मृतकाचे नाव आहे.
गणेश मेंढे याचे त्याच्या लहान भावाच्या पत्नीसोबत क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. यावेळी गणेशचा लहान भाऊ महेश बुधराम मेंढे याने भांडण करुन गणेशचा गळा आवळला. यात गणेशचा मृत्यू झाला. घटनेनंतर महेश पसार झाला. घटनेची माहिती मिळताच गोंदिया ग्रामीण पोलीसांनी तपासचक्र फिरवून एक तासात आरोपी महेशला अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप अतुलकर, अभिजीत भुजबळ, उमेश गुटाळ, रोहीदास भोर, पोलीस हवालदार जितेंद्र मिर्शा, शेखर खोब्रागडे, सुनिल गोस्वामी, पोलीस शिापाई शरद चव्हाण, अमीद नेवरे, राकेश इंदूरकर, कुंभलवार यांनी केली.





