36.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ बारव्हा शाळेच्या स्नेहसंमनेलनाता उत्साहात सुरवात

बारव्हा शाळेच्या स्नेहसंमनेलनाता उत्साहात सुरवात

0
22
लाखान्दुर,दि.31:-तालुक्यातील जि.प.प्राथ. शाळा बारव्हा व जि.प.हायस्कूल बारव्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन दिलीप ब्राह्मणकर संचालक जि.प.शा.कर्मचारी सह.पतसंस्था भंडारा-गोंदिया  व सहउद्घाटक  शिक्षक नेते यशपाल बगमारे यांच्या हस्ते पार पडले.अध्यक्षस्थानी डाॅ.संदिप लोंढे होते.कार्यक्रमाला  विशेष अतिथी म्हणून बालूभाऊ चुन्ने,मधूर उके उपसरपंच, दिलीप सलामे पो.पाटिल,रेवाचंद शेंदरे अध्यक्ष शा.व्य.समिती,आनंदराव झोडे,हिवेश्वर बूद्धे,श्यामराव बूद्धे, अमृत मदनकर सरपंच,मुख्याध्यापक नाकाडे,मुख्याध्यापक वसंत कापगते,शेकडे मुख्याध्यापक जि.प.प्राथ.शाळा रोहणी,कडेकर मुख्याध्यापक जि.प.प्राथ.शाळा खोलमारा जुना,उगलमूगले मुख्याध्यापक जि.प.प्राथ.शाळा चिचाळ,राठोड,गोपाल झोडे,विजय जाधव,वैशाली कापगते,मंदा नागोसे तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.प्रास्ताविकात मुख्याध्यापक एम.एस.खटके यांनी  शाळेच्या प्रगतीविषयी माहिती दिली.शाळेसाठी अहोरात्र झटणाऱ्या रेवाचंद शेंदरे अध्यक्ष शा.व्य.समिती यांचा गावकऱ्यांतर्फे शाल व श्रीफळ देऊन बालूभाऊ चुन्ने यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.उपस्थित सर्व मान्यवरांनी शिक्षणाच्या बाबतीत आपले मनोगत व्यक्त केले. संचालन व आभार धनंजय मुळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी कु.एस.ए.मुडा, सौ.एस.बी.हुमे,नाकाडे,खटके,मूळे,हटवार,शेंडे, श्रीमती देशमुख व जि.प. हायस्कूलचे सर्व शिक्षक वृंद यांनी मेहनत घेतली.