32.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ आमदार रहांगडालेंच्या हस्ते मृताच्या कुटुंबीयास १५ लक्ष रुपयाची मदत

आमदार रहांगडालेंच्या हस्ते मृताच्या कुटुंबीयास १५ लक्ष रुपयाची मदत

0
39

तिरोडा,दि.31ः-तालुक्यातील निताराम बिसेन या शेतकऱ्याचा अस्वलाच्या हल्यात 11 जानेवारीला मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियावर संकट ओढवले होते.त्यामुळे बिसेन यांच्या कुटुंबियांना शासनाकडून तत्काळ मदत मिळावी याकरिता आमदार विजयभाऊ रहांगडाले यांनी वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करून १५ लक्ष रुपयाची आर्थिक मदत मृत कुटुंबाच्या पत्नीस मिळवून दिले.त्या रकमेचा धनादेश आज 31 जानेवारीला आमदार रहागंडालेच्या हस्ते ५ लक्ष रुपयाचे चेक व ५ लक्ष ५ वर्षाकरिता व ५ लक्ष १० वर्षाकरिता मुदत ठेव म्हणून मृताची पत्नी मालता सिताराम बिसेन यांना देण्यात आले.यावेळी प्रामुख्याने तिरोडा वनपरीक्षेत्राधीकारी शेषराज आकरे, तहसीलदार प्रशांत घोरुडे,महिला मोर्चा तालुकाध्यक्षा तुमेश्वरी बघेले,संगानियो तालुकाध्यक्ष चत्रभुज बिसेन, नायब तहसीलदार  वनकडे उपस्थित होते.