गोंदिया,दि.१ः मागील अनेक वर्षापासून पालिकेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा प्रश्न अद्यापही मार्गी लावता आलेला नाही. टेमनी, कटंगी, चुलोद, आदी गावांची चाचपनी झाल्यानंतर तेथील ग्रामपंचायतीने स्पष्ट नकार दिला. आता पालिकेने रतनारा तसेच कारंजा येथे प्रयत्न केले. मात्र ते ही निष्फळ ठरले. हा तिढा अद्यापही कायम असून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने शहरातील अनेक प्रभागात आजघडीला स्वच्छ सर्वेक्षण सुरू असतांनाही केरकचNयाचे ढिग दिसून येत आहेत. एकीकडे देशात कोरोना नावाचे संसर्गजन्य आजारा पाय पसरवित असतांना दुसरीकडे मात्र शहराची अस्वच्छता याला कारणीभूत तर ठरणार नाही, अशीही शंका व्यक्त होऊ लागली आहे. वेंâद्र व राज्य शासनाने सन २०१४ पासून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासकीय कार्यालयांसह खाजगी संस्थांनाही या मोहितमेत जोडून घेतले. मात्र नगर पालिकेचा विचार केल्यास ही मोहिम अद्यापही होर्डिंगवरच लटवूâन असल्याचे चित्र दिसून येत आहे. जोपर्यंत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागणार नाही, तोपर्यंत ही समस्या कायम राहणार आहे.





