36.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home क्रीडा भजेपार चषक गोंदिया जिल्ह्याचा गौरव-आ.सहषराम कोरोटे

भजेपार चषक गोंदिया जिल्ह्याचा गौरव-आ.सहषराम कोरोटे

0
40

अंतरराज्यीय महिला, पुरुष कबड्डी महासंग्रामाचे उद्घाटन थाटात संपन्न

सालेकसा,दि.01ः-सालेकसा तालुका हा आदिवासी बहुल मागास व नक्षल दृष्ट्याअतिसंवेदनशील म्हणून ओळखला जातो. भजेपार या छोट्याशा गावात आंतरराज्य महिला, पुरुष कबड्डीचा महासंग्रामचे भव्यदिव्य सर्वोत्कृष्ट आयोजन म्हणजे भजेपार चषक गोंदिया जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने गौरवच आहे. भजेपार चषकमधून उत्कृष्ट कबड्डी खेळाडू निर्माण होऊन राज्यस्तरापर्यंत पोहचले असून जनू भजेपार चषक खेळाडू निर्मितीची खान ठरत आहे. कबड्डी या खेळाची मातीशी नाळ जुळली असून या खेळाची खरी राखन भजेपार चषकच्या माध्यमातून केली जात आहे. भजेपार गावातील तरुणाईचे हे कार्य गावाच्या गौरवासह जिल्ह्याचे गौरव वाढविणारे आहे. असे वक्तव्य आमदार सहषराम कोरोटे यांनी केले आहे. ते सूर्वोदय क्रीडा मंडळ व ग्राम पंचायत भजेपार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराज्यीय महिला पुरुष कबड्डीचा महासंग्राम या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक स्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून व स्व. इंजि. वसंत बहेकार यांना श्रद्धांजली देऊन करण्यात आली.
कबड्डी हा खेळ ग्रामीण भागात प्रामुख्याने खेळला जात असतो. लोकांचे घनिष्ठ नातं या खेळाशी आहे. युवकांनी खेळांमध्ये आपलं भविष्य उज्वल करण्याबरोबरच राष्ट्रीय पातळीवर गावाचं नाव लौकिक करण्यासाठी प्रयत्न करावे असे वक्तव्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून माजी वनमंत्री भरतभाऊ बहेकार यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी सत्कारमुर्ती म्हणून उपस्थित जागतिक कीर्तीची तिरंदाजी खेळाडू मोनाली जाधव व अभिषेक ठावरे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन उपस्थित अतिथींच्या हस्ते गावकऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लताताई दोनोडे सभापती महिला व बालकल्याण जि.प. गोंदिया, सकारामजी राऊत सरपंच ग्राम पंचायत भजेपार, नामदेव किरसान, उषाताई मेंढे, संगीताताई शहरे, वासुदेवजी चुटे, संपत सोनी, कैलास बहेकार, रवी नोणारे, प्रभाकर दोनोडे, तुकाराम बोहरे, राजू काळे, संजय देशमुख, व्हि.डि. मेश्राम, एम. एम. देवरे, इसराम बहेकार, संतोष बोहरे, नामदेव दोनोडे, शैलेश बहेकार, सुनील तरोणे, मनीराम ब्राह्मणकर, आत्माराम उईके, पवन पाथोडे कृष्णकुमार मेंढे, लोकराम राऊत, सरस्वता बहेकार, तरासन बहेकार, चंद्रकला बहेकार, प्रभाबाई चुटे, ललिताबाई पाथोडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरावर कबड्डी स्पर्धेसाठी खेळण्यास गेलेल्या रणजीत बहेकार व मयूर मेंढे या खेळाडूंचे स्मृतिचिन्ह देऊन गौरवान्वित करण्यात आले. तसेच भजेपार एकता दौड स्पर्धेत परिसरातील तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला असता महिला गटात प्रथम ममता गायधने, द्वितीय मंजु पाथोडे, तृतीय दुर्गा खोटेले, पुरुष गटात प्रथम उमेश बहेकार, द्वितीय राहुल कोरे, तृतीय डिलेश्वर शेंडे यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सर्वोदय क्रीडा मंडळ, युवक कबड्डी क्लब भजेपारचे अध्यक्ष चंद्रकुमार बहेकार यांनी मांडले तर कार्यक्रमाचे संचालन रमसुला चुटे यांनी केले असून उपस्थितांचे आभार हेमंत चुटे यांनी मानले. उद्घाटनिय कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुर्योदय क्रीडा मंडळ व ग्राम पंचायत भजेपार च्या पदाधिकाऱ्यांनी व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.

खेळाडूंनी मोठे ध्येय बाळगावे: मोनाली जाधव
भजेपार चषक च्या माध्यमातून सूर्योदय क्रीडा मंडळ ग्रामीण खेळाडूंना संधी उपलब्ध करुन देत असुन मंडळाची कामगीरी अभिमानास्पद आहे. खेळाडूंनी केवळ जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय स्तरापर्यंत मर्यादीत न राहता देशाचे प्रतिनिधित्व बाहेर देशात करण्याचे मोठे ध्येय बाळगावे. आपल्या पाठीवर तिरंगा आणि पोशाखावर इंडिया लिहिलेलं असावं हे स्वप्न प्रत्येक खेळाडूने बघुन त्या दिशेने परिश्रम करावं.मेहनतीने नक्किच यश प्राप्त होते. आशा प्रकारचे मत जागतिक कीर्तीची तिरंदाजी खेळाडू मोनाली जाधव हिने व्यक्त केले.