गोंदिया,दि.01 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुण्यतिथीचे औचित्य साधून व स्पर्श कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृती अभियानांतर्गत श्रीराम विद्यालय खमारी येथे तालुकास्तरीय उद्घाटन कार्यक्रम कुष्ठरोग कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सीमा यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे, श्रीराम विद्यालय खमारीच्या प्राचार्य श्रीमती चौव्हाण, प्राथमिक आरोग्य केंद्र खमारीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनवाने, तसेच कुष्ठरोग व क्षयरोग कार्यालयाचे कर्मचारी, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्र खमारीचे कर्मचारी व श्रीराम विद्यालय खमारीचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे उपस्थितीत पार पडला.
तत्पुर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करुन त्यांना दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली देण्यात आली. यानंतर वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक कुष्ठरोग हरिष चिंधालोरे यांनी क्षयरोगाबद्दल माहिती दिली. निम वैद्यकीय कर्मचारी कुष्ठरोग रविंद्र जाधव यांनी कुष्ठरोगाबद्दल माहिती दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ.सीमा यादव यांनी स्पर्श कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृती अभियानाबाबत माहिती देवून उपस्थितांना कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत प्रतिज्ञा दिली. त्यानंतर मान्यवरांनी शालेय विद्यार्थ्यांच्या रॅलीला हिरवी झेंडी दाखवून स्पर्श कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृती अभियान 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2020 चे शुभारंभ केले. कार्यक्रमाचे संचालन आरोग्य सहायक शालिकराम जवंजार यांनी केले. उपस्थितांचे आभार आरोग्य सहायक निलकंठ करंजेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खमारीचे कर्मचारी तसेच श्रीराम विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
स्पर्श कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृती मोहीम
अर्जुनी मोरगावः– महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्य स्पर्श कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृती कार्यक्रम आज दि. 30 जानेवारी 2020 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल बोडंगावदेवी व बहुद्देशीय हायस्कूल अर्जुनी मोर येथील शालेय विद्यारथ्यांना कुष्ठरोग व क्षयरोग या आजाराबद्दल डॉ विजय राऊत तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एम. चौधरी ता.आरोग्य सहाय्यक , झेड. बी.गायकवाड तालुका समूह संघटक,विलास एस. कारेवार निम वैद्यकीय कर्मचारी व कु. रिजवाना शेख वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
उपरोक्त कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्ही. आर. खंडाईत मुख्यध्यापक जि.प.हाय. बोडगावदेवी , साखरे आरोग्य सेवक , कु. लोहारे ,कु. पी. टी. राऊत आरोग्य सेविका,भगत व मडावी , आशा व सर्व शिक्षक वृन्द ह्यांनी सहकार्य केले.





