33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ संविधान जनजागृती ही काळाची गरज-दिवाणी न्यायाधीश रवींद्र भेंडे

संविधान जनजागृती ही काळाची गरज-दिवाणी न्यायाधीश रवींद्र भेंडे

0
44

चिमूर,दि.02–ःभारताचे संविधान म्हणजे केवळ त्यातील शब्द नव्हेत. तर या देशातील व्यक्ती केंद्रस्थानी मानून, स्वातंत्र्य आणि समतेची आस धरणारा एक जिवंत दस्तावेज आहे. संविधानाची पायाभूत मूल्य न्यायपालिकेने जपलीच पण ती लोकांमध्ये-नागरी समाजातही रुजायला हवीत. संविधान जनजागृती ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन चिमूर न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश रवींद्र भेंडे यांनी व्यक्त केले.
तालुका विधी सेवा समिती, तालुका अधिवक्ता संघ, नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, संत भय्यूजी महाराज विद्यालय, न्यू राष्ट्रीय विद्यालय, मुलींची निवासी शासकीय शाळा यांच्यासंयुक्त विद्यमाने मुलींची निवासी शासकीय शाळेत ३१ जानेवारीला आयोजित संविधान जनजागृती कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
अध्यक्षस्थानी चिमूर न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश रवींद्र भेंडे होते. प्रमुख अतिथी म्हणून, चिमूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड.रघुनाथ सोंडवले, नेहरू कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. वाघधरे, न्यू राष्ट्रीय विद्यालयाच्या डॉ.अश्‍विनी रोकडे, आठवले समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ. संजय पिठाळे, मुलींची निवासी शासकीय शाळेच्या मुख्याधापिका मेर्शाम, संत भय्यूजी महाराज विद्यालयाच्या पाटील, चिमूर तालुका बार असोसिएशनचे महेशदत्त काळे, जे. डी. मुन, नवयुग कामडी, मधुकर लांबट, गुणवंत अगडे, गुरपुडे, नितीन रामटेके, शैनेशचंद्र श्रीरामे, धनराज वंजारी, संजीवनी सातरडे, ललीत हलमारे, सुभाष नन्नावरे, संजय पाटील, रणजीत रामटेके आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
चिमूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. रघुनाथ सोंडवले, नेहरू कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. वाघधरे, न्यू राष्ट्रीय विद्यालयाच्या डॉ. अश्‍विनी रोकडे, आठवले समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ. संजय पिठाळे, मुलींची निवासी शासकीय शाळेच्या मुख्याधापिका मेर्शाम, संत भय्यूजी महाराज विद्यालयाच्या पाटील आदीने मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान शहरातील मुख्य मार्गाने संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली. संचालन सहायक अधीक्षक राखुंडे यांनी केले. उपस्थितांचे आभार न्यायालयाचे कर्मचारी विदोलीकर यांनी मानले.