40.3 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home शैक्षणिक मोहजा येथे तंबाखूमुक्त शाळा अभियान

मोहजा येथे तंबाखूमुक्त शाळा अभियान

0
67

वाशिम, दि. ०5 : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत मोहजा जिल्हा परिषद शाळेत तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविण्यात आले. या अभियानाद्वारे शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनातून मुक्त केले. मोहजा जिल्हा परिषद शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून मुक्त झालेल्या पालकांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी सरपंच उषा प्रभाकर सरनाईक, उपसरपंच सविता विजय कढणे, पोलीस पाटील अनिल सरनाईक, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामेश्वर कढणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष वर्षा गजानन खडसे, उपाध्यक्ष चंद्रकांत कढणे, पंचायत समिती सदस्य श्री. गोरे, श्री. खरात, श्री. नाचोने, श्री. देशमुख उपस्थित होते.यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी तंबाखूमुक्त जीवनाचा संकल्प करून संपूर्ण गाव तंबाखूमुक्त करण्याचा निर्धार केला. या कार्यक्रमाकरिता राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे, प्रवीण गोरे, उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्री. मुसळे यांच्यासह शिक्षक वृंद व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.