38 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ सुसंस्कृत पिढी घडविण्यात मानकर गुरुजींचा सिहांचा वाटा – डॉ. कोठेकर

सुसंस्कृत पिढी घडविण्यात मानकर गुरुजींचा सिहांचा वाटा – डॉ. कोठेकर

0
61

आमगाव,दि.०5:राज्यात सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात र्शद्धेय म्हणून आदराने घेतल्या जाणार्‍या नावापैकी एक लक्ष्मणराव मानकर गुरुजींचे हे एक आहेत. खास करून तत्कालीन भंडारा व आताच्या गोंदिया जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान नेहमीच प्रेरणा देणारे आहे. एक कर्मष्ठ, निष्ठावंत कार्यकत्यांसह लोकनेता म्हणून ते नागरिकांच्या लक्षात राहतात. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सुसंस्कृत पिढी घडविण्याचे कार्य केले, असे प्रतिपादन भाजपाचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी केले.
ते भवभूती शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित र्शद्धेय लक्ष्मणराव मानकर जयंती समारोहाचे प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी आ. विजय रहांगडाले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. विनोद अग्रवाल, आ. सहसराम कोरोटे, माजी आ. संजय पुराम, माजी आ. भेरसिंह नागपुरे, माजी खा. खुशाल बोपचे, भवभूती शिक्षण संस्थेचे कार्यवाह माजी आ. केशवराव मानकर, अध्यक्ष सुरेशबाबू असाटी, उपाध्यक्ष प्रमोद कटकवार, संचालक स. रं. अंजनकर, ढे. र. कटरे, रमेश कावळे, हरिहर मानकर, उर्मिला कावळे, लक्ष्मी नागपुरे, जयंती समारोह संयोजक प्राचार्य दिनेश एम. राऊत, घटक संस्थेचे प्राचार्य डॉ. श्रीराम भुस्कुटे, डॉ. डी. के. संघी, एस. टी. बिसेन, ओ. बी. शेंडे, उमादेवी रहांगडाले, संदीप हनुवते, नंदलाल कथलेवार, भवभूती शिक्षण संस्था कर्मचारी पत संस्थेचे अध्यक्ष झेड. एस. बोरकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आ. विजय रहांगडाले म्हणाले, गुरुजींचे संपूर्ण जीवनच हे स्फूर्ती देणारे आहे. त्यांच्यापासून मिळालेल्या प्रेमामुळेच आज जिल्ह्यासह पूर्व विदर्भात संघ व पक्षात अनेक कार्यकर्ते वाटचाल करीत आहेत. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय वाटचालीत त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आजही गुरुजींचे विचार व प्रेरणेतून आजही अनेक कार्यकर्ते घडत असल्याचे ते म्हणाले. आ. विनोद अग्रवाल म्हणाले, गुरुजींचा प्रेरणेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य, समाजसेवेसाठी राजकारण करण्याची प्रेरणा मिळाली. जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात गुरुजींनी क्रांती आणली. आज संस्थेच्या अनेक शाळांमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अनेक विद्यार्थी उच्च पदस्थ आहेत. कोणतेही यश हे संकटावर खंबीरपणे मात केल्यावरच मिळते, हे गुरुजींच्या जीवन कायार्तून प्रतिबिंतीत होत असल्याचे ते म्हणाले. आ. सहसराम कोरोटे म्हणाले, गुरूजींचे कार्य आजही परिस्थितीजन्य आहेत. गुरुजींचे संपूर्ण जीवन संघर्षातून यशाकडे घेऊन जाणारे होते. त्यांच्या याच विचारसणीतून आपणही आपल्या जीवनाची वाटचाल करीत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, गुरुजींच्या राजकीय व सामाजिक कार्यात सोबती असलेले डॉ. देवाशिष चॅटर्जी, ईश्‍वरदास असाटी, सेवकराम ब्राम्हणकर, बालाप्रसाद दुबे, संतोष चव्हाण यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विविध खेळातील प्राविण्य प्राप्त खेळाडू, गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोबतच गोंदिया येथील संघी परिवारातर्फे दरवर्षी दिला जाणारा संघी टॉपर्स अवॉर्डने विविध शाखेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकेतून संस्थेचे कार्यवाह माजी. आ. केशवराव मानकर यांनी संस्थेचा प्रगतीचा अहवाल सादर केला. दरम्यान, जयंतीनिमित्ती आयोतित रक्तदान शिबिरात ४४ जणांनी रक्तदान केले. संचालन प्रा. उमेश मेंढे, प्रा. तोषीका पटले, प्रा. ललीत लक्षणे यांनी केले. तर आभार समारोहाचे संयोजक प्राचार्य दिनेश एम.राऊत यांनी मानले.