38 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ जिल्हा पुरवठा विभागाने २२ मिलर्सनां डावलत ६ मिलर्संनाच दिली परवानगी

जिल्हा पुरवठा विभागाने २२ मिलर्सनां डावलत ६ मिलर्संनाच दिली परवानगी

0
27

जिल्हा पुरवठा अधिकाèयावर राईस मिलर्स संघटनेने केला आरोप
अर्जुनी मोरगाव,दि.05- वखार महामंडळाच्यावतीने शहरासह तालुक्यात जवळपास २८ राईस मिल असताना केवळ सहा मिलर्संना साठवणुकीची मंजुरी देऊन इतरावंर अन्याय केल्याचा आरोप अर्जुनी मोर राईस मिलर्स संघटनेच्यावतीने पत्रकारपरिषद घेऊन करण्यात आला आहे.गेल्या काहीदिवसापर्यंत वखार महामंडळाचे कामकाज सुरळीत असतांना झालेल्या बदलामागील भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले आहे.
अर्जुनी-मोर येथील वखार महामंडळातंर्गत २८ मिलर्स असून मागील काही दिवसांपर्यंत महामंडळाचे काम सुरळीतपणे सुरू  होते.अर्जुनी-मोर येथे वखार महामंडळाचे चार गोदाम आहेत.त्यापैकी एका गोदामांमध्ये मतदान यंत्र व दुसरे शेतकèयांकरीता राखीव ठेवण्यात आले आहे.वरील दोन गोदाम सोडून इतर दोन गोदाम आठ दिवसापासून पूर्णता भरल्याने सध्या गोदामात तांदुळ भरणे पूर्णपणे बंद आहे.त्यामुळे तालुक्यातील राईस मिल संघटनेने जिल्हा पुरवठा अधिकारी गोंदिया यांना गोदाम भरल्यानंतर दुसèया गोदामाच्या व्यवस्थेबद्दल विचारणा केली असता सध्या थोडे दिवस थांबा कुठलेही गोदाम महामंडळाने भाडेतत्त्वावर घेतलेले नाही असे सांगितले.परंतु लगेच दुसèया दिवशी तीन गोदाम भाडेतत्त्वावर घेतले त्यामध्ये नंदकिशोर हरकचंद चितलांगे यांचे दोन गोदाम व श्रीकांत घाटबांधे यांचे डोगरगाव इटखेडा येथील एक गोदाम भाडेतत्वावर घेतले.त्यानंतर मात्र गोदामांमध्ये तांदूळ साठवणूक करण्याकरिता अर्जुनी-मोर वखार महामंडळांतर्गत २८ राईस मिलर्स असताना केवळ सहा राईस मिल मालकांनाच साठवणुकीची मंजुरी दिली गेली.मात्र काम करणारे मालक केवळ तीन आहेत.त्यापैकी दोन राईस मिलर्स हे शासनाचे सन २००९ – १० या आर्थिकवर्षात धान उचल करून त्या बदल्यात तांदूळ न देणाèया पैकी आहे.श्रीकृष्ण राईस मिल अर्जुनी मोरगाव, रामदेव राईस मिल अर्जुनी मोरगावसह २२ राईस मिल चालकांना डावलुन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अधिकाराचा वापर करून पुन्हा एकदा त्यांना बदनाम करण्याचा प्रकार होत आहे असा आरोपही राईस मिल संघटनेने केला आहे.२८ राईस मिलर्स पैकी केवळ सहा राईस मिल धारकांना नव्याने घेतलेल्या गोदामामध्ये साठवणुकीचे पत्र देऊन इतर २२ राईस मिलर्स चालकांना का डावलण्यात आले असा प्रश्न उपस्थित करुन जिल्हा पुरवठा अधिकारी डि.के. वानखेडे व संबंधित राईस मिल मालकांमध्ये मोठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा संशय राईस मिल संघटनेने पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के.वानखेडे यांनी आज भरडाईनंतर खरेदी केलेला तांदूळ उचल करण्यासाठी यवतमाळ जिल्हा कंत्राटदाराने एकतीस टड्ढक वखार महामंडळ अर्जुनी-मोर येथे दोन दिवसापासून आणले.शासनाचे आदेश असताना जिल्हा पुरवठा अधिकाèयांनी हेतूपुरस्पर यवतमाळ येथील कंत्राटदाराला व अर्जुनी मोरगाव येथील राईस मिलर्सच्या मिल मालकांना मानसिक त्रास देण्याचे काम करीत असल्याचा आरोप राईस मिल संघटनेने केला आहे.