38 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पातील फायर लाईन, कटाई व जळाईचे कामात गैरव्यवहार

नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पातील फायर लाईन, कटाई व जळाईचे कामात गैरव्यवहार

0
35

भामा चुर्हे,सडक अर्जुनी,दि.05- नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पात सन २०१७१८ मध्ये फायर लाईन, कटाई व जळाईचे काम करण्यात आले. या कामावर अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पालगत गावातील मजुराकडून कटाईचे काम करण्यात आले आणि जळाईचे काम नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पात कार्यरत बारमाही हंगामी व वनमजुराकडून करण्यात आले. मस्टरवर खास मर्जीतील व्य्नतीचे नावाने मस्टर भरून नंतर मस्टरवर बोगस नावे टाकून पैसे काढण्यात आले. या कामामध्ये मोठा गैरव्यवहार करुून शासनाची दिशाभूल करण्यात आल्याचे समोर आले आहे.दरम्यान यासंदर्भात वास्तविकता काय आहे हे जाणून घेण्यासाठी नागझिरा नवेगाव व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक पुनम पाटे यांच्याशी भ्रमणध्वनीवर बेरार टाईम्सच्यावतीने संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने विभागाची भूमिका कळू शकली नाही.

या अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पांतर्गत झालेल्या कामाची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी होत आहे. सन २०१७-१८ या वार्षिक वर्षात नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प वनक्षेत्रात फायर लाईन कटाई व जळाईचे काम करण्यात आले. सदर कटाई व जळाईच्या कामात मजुरांना २२०० रूपये प्रति किमी प्रमाणे र्नकम देण्यात आली. शासनाकडून या कामासाठी ५८९२ रूपये प्रति किमी प्रमाणे दिल्या जाते. पण तेवढी रक्कम न देता २०० रूपये प्रति किमी प्रमाणे देण्यात आली. उर्वरित रक्कम वनपरिक्षेत्रअधिकारी यांनी आपल्याकडेच ठेवले. या कामात अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या मजुराकडून फक्त कटाईचे काम करण्यात आले आणि जळाईचे काम अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पात कार्यरत बारमाही हंगामी वनमजुरांकडून करण्यात आले. या कामामध्ये कटाईसाठी १२ मजुरी प्रति किमी व ६ मजुरी जळाईसाठी प्रति किमी शासनाचे नियमाप्रमाणे आहे. परंतु असे न करता आपले खास मर्जीतील एका प्रमुख व्यक्तीचे नाव टाकून नंतर बोगस नावे मस्टरवर लिहून प्रमुख व्यक्तीच्या नावाने पूर्ण रक्कम काढून आमिष देऊन बाकीची रक्कम काढून अधिकाèयांना तो प्रमुख व्यक्ती देतो असा प्रकार नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पात सुरू आहे.सन २०१८-१९ मध्ये सुद्धा या अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पात फायर लाईन कटाई व जळाईचे कामे करण्यात आली.

या वार्षिक वर्षात कटाई व जळाई कामासाठी शासनाकडून ६२३८ रूपये प्रति किमी प्रमाणे रक्कम देण्यात आली. मात्र त्या दराने मजुरांना रक्कम देण्यात आली नाही. सन २०१८-१९ मध्ये वनपरिक्षेअधिकारी शिंदे यांचे आदेशानुसार या कामावरील मजुरांना रक्कम देण्यात आली. वनपरिक्षेत्रअधिकाèयांच्या खास विश्वासु वनरक्षक कापसे यांनी १५०० रूपये प्रति किमी दराने मजुरांना रक्कम दिली आणि हिरापुर राऊन्डमध्ये २१०० रूपय प्रति किमी आलेझरी रॉऊंड मध्ये १८०० ते २२०० रूपये प्रति किमी, कोसमतोंडी व नागझिरा रॉऊन्डमध्ये २२०० रूपये प्रति किमीप्रमाणे रक्कम देण्यात आली. विशेष म्हणजे या कामावरील मजुरांना शासनाचे नियमाप्रमाणे ६२३८ रूपये प्रतिकिमी प्रमाणे र्नकम दयायला पाहिजे होते. मात्र तसे न करता शासनाची दिशाभूल करून मजुरांना कमी दराने रक्कम देऊन उर्वरित रक्कम हडप करण्यात आली आणि या कामात भ्रष्टाचार करण्यात आला.

सन २०१८-१९ मध्ये सुद्धा सन २०१७-१८ प्रमाणे अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पातील कार्यरत बारमाही वनमजुरांकडून काम करण्यात आले. सन २०१८-१९ मध्ये सदर काम जवळपास २०० ते २२५ किमी पर्यंत करण्यात आले आहेत.वरील कामापैकी सन २०१७-१८ चे कामाची विभागाकडून थातुरमातुर चौकशी करण्यात आली आणि वनपरिक्षेत्रअधिकारी यांना वाचविण्यात आले.सदर २०१७-१८ च्या कामाची चौकशी सहाय्यक वनसंरक्षक नागझिरा वन्यजीव श्रीकांत पवार यांनी थातुरमातुर स्वरुपात करुन वनपरिक्षेत्रअधिकार्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. मर्जीने बयान तयार करून मजुराकडून बयानावर सहया करून घेतल्या व चौकशी पूर्ण करीत येथील लाखो रूपयांचा झालेला गैरव्यवहार दाबण्यात आल्याने पुन्हा ईडी मार्फत चौकशी करून दोषी वनअधिकाèयावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.