रविवारला मुख्यमंत्री,तर सोमवारला उपमुख्यमंत्री येणार
गोंदिया,दि.05: पारी कुपार लिंगो महाकली कंकाली पेनठाणा कचारगडच्यावतीने शुक्रवार (दि.७) पासून १० फेबु्रवारीपर्यंत राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशन व कोया पुनम गोंडी साहित्य संस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार ७ फेबु्रवारीला कोयापुनेमी गढ जागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून देवस्थान समितीचे मार्गदर्शक शंकर मडावी यांच्या हस्ते प्रचारक पांडुरंग खंडाते यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत दादा प्रेमसिंह सलाम व शंकरशहा इरपाची यांचे गोंडी पुनेम यावर प्रवचन आयोजित करण्यात आलेले आहे. ८ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशनाचे ध्वजारोहण व महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. गोंड राजे वासुदेवशहा टेकाम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी माजी आमदार संज़य पुराम राहणार आहेत. कार्यक्रमाला हिरामनसिंह मरकाम, शितल मरकाम, आनंद मडावी यांच्यासह समाजाचे सर्व जि.प. सदस्य व गणमान्य उपस्थित राहणार आहेत. दुपारी २ वाजता राष्ट्रीय गोंडी सांस्कृतीक महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री फगनसिंह कुलस्ते यांच्या हस्ते खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. विशेष अतिथी म्हणून केंद्रीय जनजाती कल्याण मंत्री अर्जुन मुंडा, खासदार सुनील मेंढे, राज्यसभा खासदार संपत उईके, आमदार देवराव होळी, मध्यप्रदेशचे आमदार संजय उईके, अर्जुन ककोडिया, छत्तीसगडचे आमदार चक्रधरसिंह सिदार, मनोजसिंग मडावी, विक्रम मडावी, रामकुपारqसह ठाकुर, आमदार विजय रहांगडाले, परिणय फुके, राजकुमार बडोले, विनोद अग्रवाल, माजी मंत्री अमरीश आत्राम उपस्थित राहणार आहेत. ९ फेबु्रवारी रविवारला सकाळी १० वाजता राष्ट्रीय महागोंगोना कोयापुनेम महासम्मेलनाचे उद्घाटन धुरqसह कुंभरे यांच्या हस्ते छत्तीसगड गोंडवाना महासभेचे शेरqसह आचला यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. दुपारी २ वाजता गोंडी धर्म, भाषा व संस्कृती राष्ट्रीय अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्याचे गृहमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. विशेष अतिथी म्हणून विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मध्यप्रदेशचे मंत्री ओंकारसिंह मरकाम, छत्तीसगडचे मंत्री अनिला भेडीया, टी.एस.सिंहदेव, प्रेमसहाय टेकाम, आमदार सहषराम कोरोटे, धर्मरावबाबा आत्राम, मनोहर चंद्रीकापुरे व एस.पी. शोरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. १० फेबु्रवारी सोमवारला दुपारी १२ वाजता आयोजित राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या हस्ते आदिवासी विकास मंत्री अॅड.के.सी.पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. विशेष अतिथी म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री कवाची लकमा, अमरजीत भगत, जि.प. अध्यक्ष सीमा मडावी, आमदार डॉ. संदीप धुर्वे, इंद्रसहा मडावी, गुलाबqसह कमरो, क्रांती अनुपनाग, लक्ष्मी धुर्व, भीमराव केराम, मारोतराव कोवासे, रमेश ताराम, रामरतन राऊत, दीपक आत्राम, आनंदराव गेडाम आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दुपारी २ वाजता राष्ट्रीय गोंडवाना महासम्मेलनाचे आयोजन करण्यात आले असून कर्नाटकातील साहित्यीक डॉ.के.एम.मैत्री यांच्या हस्ते चंद्रलेखा कंगाली यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. मंगळवार ११ फेबु्रवारीला राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशनाचे समारोप नगराध्यक्ष विरेंद्र उईके यांच्या हस्ते भरत मडावी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमाला देशातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.





