40.3 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home शैक्षणिक संगणक शिक्षकांचे समायोजन करा,आमदारांची शरद पवाराकंडे धाव

संगणक शिक्षकांचे समायोजन करा,आमदारांची शरद पवाराकंडे धाव

0
46
अंजनसिंगी,दि.07ः-संगणक शिक्षकांना मानधन तत्वावर सामावून घेण्याच्या प्रस्तावास PAB ची मंजुरी लवकरात लवकर मिळावी,यासाठी अमरावती शिक्षक मतदार संघाचेआमदार प्रा.श्रीकांत देशपांडे,पुणे शिक्षक मतदार संघाचे आमदार दत्तात्रय सावंत व कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांनी दिल्ली येथे राष्ट्रवादी अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांची भेट घेतली.संगणक शिक्षक व आय.सी.टी.कक्ष हे शाळा व विद्यार्थ्यांना साठी किती आवश्यक आहे याची खात्री करुन दिली.त्यानंतर खा.पवार यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश निशांक पोखरियाल यांच्याशी ०५ फेबुवारीला शास्त्री भवन, दिल्ली येथे बैठक आयोजित करुन संगणक शिक्षकांच्या विवीध प्रश्नावर सकारात्मक चर्चा करण्यात आल्याची माहिती आमदार प्रा.श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.
झालेल्या चर्चेत  लवकरात लवकर PAB  ची बैठक आयोजित करून समग्र शिक्षा अभियान मधून संगणक शिक्षकांना मानधन तत्वावर सामावून घेण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्याची मागणी शिक्षक आमदार प्रा.श्रीकांत देशपांडे यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री पोखरीयाल यांचे कडे केली. यावर केंद्रीय मंत्री पोखरीयाल यांची सकारत्मकता दाखवत फेब्रुवारी महिन्यातच PAB ची बैठक आयोजित करण्यात येईल व प्रस्तावास मान्यता देण्यात येईल असे पोखरीयाल यांनी सांगितले. खा.शरद पवार यांनी संबंधित विषया संदर्भात पत्र केंद्र सरकारला देतो तसेच राज्यातील सरकारला सुध्दा  आवश्यक त्या सूचना देवून प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर निकाली काढून देण्याचे आश्वासन दिले.