38 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ कृउबासच्या संचालक मंडळाची निवडणूक सहा महिन्यांनंतर

कृउबासच्या संचालक मंडळाची निवडणूक सहा महिन्यांनंतर

0
25

गोंदिया, ,दि.०७:कृषी उत्पन्न बाजार समितीच्यासंचालक मंडळाचा कार्यकाळ संपून दोन वर्षे लोटली आहेत. ही निवडणूक आता नवीन सुधारित नियमांनुसार होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी भाजपा सरकारने १३ जून २०१७ रोजी आदेश जारी करून संचालक मंडळाची निवडणूक शेतकरी गटातून करविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर १० ऑक्टोबर २०१७ रोजी गोंदिया कृषी उप्तन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ समाप्त झाला. संचालक मंडळाद्वारे न्यायालयातून स्थगनादेश मिळविण्यात आला होता. नंतर शासनाद्वारे जाहीर नवीन नियमांनुसार निवडणूक प्रक्रियेची तयार करण्यात आली होती. यात कृषी उप्तन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला निवडण्याचा अधिकार, ज्या शेतकèयांजवळ १० आर. कृषी भूमी असेल, त्यांच्याकडे देण्यात आला. सदर निवडणूक प्रणाली खूप कठीण व खर्च वाढविणारी होती. त्यामुळे नवीन महाआघाडी सरकारने २४ जानेवारी रोजी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विभाग अधिनियम १९६३ च्या कलम १४ (३) (अ) नुसार विशेष अधिकारी व लोकहितात मागील शासनाने जाहीर केलेली निवडणूक प्रणाली थांबविली व निवडणुकीला पुढील सहा महिन्यांसाठी समोर ढकलले होते. त्यामुळे आता पुन्हा नवीन पद्धतीनुसार निवडणूक होणार आहे. यात संचालकांची निवडणूक विविध नागरी सहकारी संस्था, व्यापारी गट व कामगार गटांच्या सदस्यांद्वारे केली जाईल. आता गोंदिया येथील कृषी उप्तन्न बाजार समितीच्या संचालकांची निवडणूक पुढील सहा महिने पुढे ढकलण्यात आली आहे.