38 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेसाठी चंद्रपूर ते शिवनेरी पदयात्रा

ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेसाठी चंद्रपूर ते शिवनेरी पदयात्रा

0
51

चंद्रपुर,दि.07 :राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे, महासचिव सचिन राजुरकर यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणनेसाठी चेकनिंबाळा (चंद्रपूर) ते शिवनेरी (पुणे) पर्यंत चंद्रपुर जिल्ह्यातील युवकांची पदयात्रा (दि.5) सकाळी 8:00 वाजता चेकनिंबाळा (चंद्रपूर) येथुन निघाली. वाटेत ठीकठीकाणी या पदयात्रेचे स्वागत करण्यात आले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून या पदयात्रेचे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती, दाताळा रोड येथे स्वागत करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.ही पदयात्रा 19 फेबृअरी 2020 ला शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे दर्शन घेणार आहे.या पदयात्रेत अंकुश कौरासे, मंगेश टोंगे, प्रफूल उपरे, देवेंद्र बोबडे, विजय ऊरकूडे, संदीप ऊरकूडे, गोपाल नांदेकर, प्रकाश टेकाम, अशोक गोचे, गजानन वैद्य, अनिल डाखरे, या चंद्रपूर जिल्ह्यातील अकरा युवकांचा सहभाग आहे.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिनेश चोखारे, उपाध्यक्ष रणजित डवरे, जिल्हाध्यक्ष प्रा. नितीन कूकडे, जिल्हा सचिव प्रा. विजय मालेकर, उपाध्यक्ष प्रा. बबनराव राजुरकर, कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शामकांत लेडे, प्रा. अशोक पोफळे, प्रा. रविकांत वरारकर, निरज गोंडे, योगेश बोबडे, नामदेव जुनघरे, तुराणकर सर, गौरकार सर, रवि जोगी, आदी उपस्तीत होते.