सडक अर्जुनी,दि.07ः-ओबीसी संघर्ष कृती समिती गोंदिया जिल्हा,राष्ट्रीय ओबीसी महासंघ,ओबीसी सेवा संघ व ओबीसी अधिकारी-कर्मचारी महासंघाच्यावतीने जनगणनेत ओबीसींचा रकाना तयार करण्यात यावा या मागणीला घेऊन 5 फेबुवारीपासून निघालेल्या ओबीसी जनगणना जागृती यात्रेचे आगमन सडक अर्जुनी तालुक्यात झाले.ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या यात्रेचे स्वागत केल्यानंतर आज शुक्रवारला सकाळी 10 वाजता येथील त्रिवेणी शाळेतून तहसिल कार्यालयावर जनजागृती रॅॅली काढण्यात आली.या रॅलीमध्ये तालुकास्थळावरील सर्व शाळेतील विद्यार्थी स्वयस्पुर्तपणे शिक्षकांसह सहभागी झाले होते.
तहसिल कार्यालयासमोर रॅलीचे सभेत रुपांतर झाल्यानंतर बहुजन समाजातील महानुभावांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी जनगणना कशासाठ हवी यावर सविस्तर माहिती देत सर्व जनतेला ओबीसी जनगणने यात्रेच्या गोंदियातील समारोपीय कार्यक्रमाला हजारोच्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन केले.अर्जुनी मोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनीही तहसिल कार्यालयासमोरील कार्यक्रमात उपस्थित राहून संघटनेच्या या लढ्यात आपला संपुर्ण पाठिंबा असल्याचे जाहिर केले.ओबीसींचा विकास करावायचा असेल तर पक्षभेद सारुन जनगणनेच्या काॅलमसाठी दबाव निर्माण करण्याची गरज असल्याचे विचार मांडले.यावेळी राजु पटले,एफ.आरटी शहा,राजेश कठाणे,छाचा चव्हाण,विलास शिवणकर,अशोक लंजे,दामोदर नेवारे,पुष्पा खोटले,गंगाधर परशुरामकर यांनीही विचार व्यक्त केले.
यावेळी मंचावर जिल्हाध्यक्ष बबलु कटरे,नगराध्यक्ष देवचंद तरोणे, जि.प.गटनेते गंगाधर परशुरामकर,माजी जि.प.उपाध्यक्ष छाया चव्हाण,शेषराव गिर्हेपुंजे, ,तालुकाध्यक्ष दिनेश हुकरे,माधव तरोणे,अशोक लंजे,पुष्पा खोटेले, मधुसुदन दोनोडे,दामोदर नेवारे,दिनेश हुकरे,रजनी गिरेपुंजे,शिक्षक पतसंस्थेचे संचालक किशोर डोंगरवार,युवक काँग्रेस नेते निशांत राऊत, आशिष येरणे,रोशन बडोले,ओबीसी सेवा संघ तालुकाध्यक्ष भुमेश्वर चव्हाण,एफ.आर.टी.शहा,लिलेश रहागंडाले,विलास शिवणकर,उपसभापती राजेश कठाणे,सभापती गिरधारी हत्तिमारे,तुकाराम राणे,उमराव मांढरे,राजेश हुकरे,भुमेश्वर कठाणे,वंदनाताई डोंगरवार,प्रिती राजगिरे,संदिप तिडके,राजेश चांदेवार,भिवगडे,बोपचे,गहाणे,नामदेव लंजे,छिलिया ब्राम्हणकर,अनुबाई कोरे,डी.आय.कटरे,अनिल बावने,राजेश मुनिश्वर,बबलु महारवाडे,किशोर शेंडे,हेमराज मेंढे,अर्जुन घरोटे,राजु पटले,अशोक लांजेवार,सरपंच हेमराज खोटेल,नरेश चव्हाण,नरेश भांडारकर,देवेंद्र तुरकर,ओंकार मेंढे,राजेंद्र आरसोडे,उत्तम कोरे,किसन बिसेन,रेखा शेंडे,जि.प.सदस्य माधुरी पातोडे,वैशाली हत्तिमारे,अर्चना डोंगरवार,इंदु परशुरामकर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्तविक माधव तरोणे,संचालन दिनेश हुकरे यांनी केले तर आभार शेषराव गिर्हेपुंजे यांनी मानले.कार्यक्रमासाठी ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ पदाधिकारी सदस्य सर्व ओबीसी शिक्षक समितीचे पदाधिकारी, सर्व ओबीसी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य ,सर्व पक्षाचे तालुका अध्यक्ष त्याचप्रमाणे सर्व हायस्कूल ,जुनियर कॉलेज मध्ये शिक्षण घेणारे ओबीसी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.




