33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ कचारगडच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही-केंदीयराज्यमंत्री कुलस्ते

कचारगडच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही-केंदीयराज्यमंत्री कुलस्ते

0
41

गोंदिया,दि.08: सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे पारी कुपार लिंगो महाकली कंकाली पेनठाणा कचारगडच्यावतीने आज शुक्रवार (दि.8) पासून १० फेबु्रवारीपर्यंत आयोजित राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशन व कोया पुनम गोंडी साहित्य संस्कृती महोत्सवाचा शुभारंभ केंद्रिय राज्यमंत्री फगनसिंह कुलस्ते यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलतांना केंद्रीयराज्यमंत्री कुलस्ते म्हणाले की,आदिवासी समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या या भूमिच्या विकासासाठी कुठल्याही स्थितीत निधीच कमतरता भासू देणार नाही.तिर्थस्थळाच्या विकासासाठी २१ कोटी रुपयाचा प्रस्तावित निधीपेक्षाही अधिक निधी वेळप्रसंगी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन त्यांनी शुभारंभ प्रसंगी केले.कार्यक्रमाची सुरवात ध्वजारोहण व पुजा अर्चना करुन करण्यात आली.अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते.यावेळी आमदार सहसराम कोरेटे, माजी आमदार संज़य पुराम ,कवियत्री उषाकिरण आत्राम,अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे यांच्यासह गणमान्य नेते उपस्थित होते.अधिवेशनाच्या उदघाटनानंतर कवियत्री उषाकिरण आत्राम लिखित ३ पुस्तकांचे प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री फगनसिंह कुलस्ते व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.