भंडारा,दि.08ः भंडारा नगरपरिषदेवर भारतीय जनता पक्षाची हकहाती सत्ता असून विद्यमान खासदार सुनिल मेंढे हे अद्यापही नगराध्यक्ष पदावर विराजमान आहेत.त्यातच नगरपरिषदेच्या उपाध्यक्षांनी राजीनामा दिल्याने आज उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार दिनेश भुरे यांना समर्थन दिल्याने त्यांची निवड झाली.या निवडणुकीदरम्यान भाजपचे 2 नगरसेवक गैरहजर राहिल्याने चर्चेला उधाण आले आहे.नगरसेवकामध्ये खासदार असलेल्या नगराध्यक्षाप्रती मोठी नाराजी असल्याचे दिसून आले.





