गोंदिया,दि.०९ः-क्षत्रीय पोवार समाज संघटन नंगपुरा मुर्रीच्यावतीने सोमवार १० फेबुवारीला राजाभोज महोत्सव व समाज मिलन समारोहाचे आयोजन विठ्ठल रुकमिणी मंदीर परिसर राजाभोज चौक येथे करण्यात आले आहे.नंगपुरा मुर्री,स्कुलटोली,संजयनगर,बाजपेयी वार्ड,पैकनटोली,श्रीनगर च्या सयुंक्तवतीने आयोजित या कार्यक्रमाला राष्ट्रीय पवार क्षत्रीय महासभेचे अध्यक्ष इंजि.मुरलीधर टेंभरे,संगठन सचिव खेमेंद्र कटरे,प्रगतीशिल पवार मंचचे अध्यक्ष एॅड.पृथ्वीराज चव्हाण,कुमेश्वर भगत,किसान गर्जेनेचे अध्यक्ष इंजि.राजेंद्र पटले,माजी जि.प.सदस्य संजय टेंभरे,अॅड.राजकुमारी कटरे,फुलचूर पोवार संघटनेचे अध्यक्ष राजेश अंबुले,छोटा गोंदियाचे प्रमेश बिसेन,कुडवाच्या सरपंच श्यामदेवी ठाकरे,सुर्याटोला संघटनेचे अध्यक्ष नेतराम गौतम,सामाजिक कार्यकर्ते पप्पू पटले आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.सकाळी ११ वाजता जेष्ठ नागरिकासंह गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दुपारी २ वाजता महिलासांठी हळदीकुंकू कार्यक्रम,रात्री ८ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून समाजबांधवानी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन क्षत्रीय पोवार संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.





