33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ कृषीमित्र महेंद्र ठाकूर यांचा कृषीमंत्र्याच्या हस्ते सत्कार

कृषीमित्र महेंद्र ठाकूर यांचा कृषीमंत्र्याच्या हस्ते सत्कार

0
50

गोंदिया,दि.०९-जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील शेतकèयांना सेंद्रिय शेतीकडे वळविण्यासह विविध प्रयोग करीत कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे महेंद्र श्रीराम ठाकूर यांचा राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कृषी विभागाच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन नागपुरातील वनामती येथे करण्यात आले होते. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत सर्व वरिष्ठ अधिकाèयांसमक्ष महेंद्र ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले. कृषीच्या क्षेत्रासह तंत्रज्ञानाचा अभ्यास करुन नोकरी करीत असतानाच आपल्या भागातील शेतकèयांसाठी काही तरी करायला हवे हा विचार मनात ठेवून नोकरी सोडून कृषी क्षेत्रात अनेक नवीन प्रयोग त्यांनी केले. हे करताना स्वत:सोबतच इतर शेतकèयांनाही सेंद्रिय शेतीकडे वळविण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. सेंद्रिय शेतीसोबतच ऋतुमानानुसार फळांची लागवड करुन बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचे ते काम करतात.कॉन्ट्रक्ट फार्मिंगच्या माध्यमातूनही शेतकरी उत्पादक कंपनीची सुरुवात करून शेतकèयांना एकत्रित आणत कामाचे सामूहिक नियोजन करताना शेतकèयांचे हित जोपासण्यासाठी नवनवीन प्रयोग त्यांनी करण्यास सुरुवात केली.शेतमालावर प्रक्रिया करणारी यंत्रणा आणून शेतकèयांच्या उत्पादनाला अधिक भाव कसा मिळेल,यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.त्यांच्या या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेत कृषी विभागाने त्यांचा सन्मान केला आहे.