स्व.मनोहरभाई पटेल जंयतीनिमित्त स्वर्णपदक वितरण
शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे दोन वर्षात करणार काम पुर्ण
गोंदिया शिक्षण संस्थेतंर्गत उत्कृष्ठ कार्य करणार्या कर्मचार्याचा सत्कार
गोंदिया,दि.09ः– राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट म्हणाले की,वेळप्रसंग बघून काम करण्याची गरज असून आम्ही ज्या शिक्षण देत आहो ते विद्यार्थ्यांच्या मनात कशाप्रकारे जाईल व चांगली पिढी घडेल हे महत्वाचे आहे.चांगल्या शिक्षणासोबतच युवकांना रोजगार कसे उपलब्ध होईल याचेही नियोजन आवश्यक आहे.शिक्षेचे वरदान पैशाने विकत घेता येत नाही.शिक्षणावर जो निधी खर्च केला जातो तो भविष्यातील इनवेस्टमेंट आहे.गावखेड्यातील मुले शिक्षित होऊन उच्च पदावर पोचेल जिलाधिकारी,आयएएस,आयपीएस बनेल तेव्हा खरा विकासाची योजना तयार होतील.गावातील व्यक्ती जिल्हाधिकारी झाला तर त्याला धानाला कधी पाणी लागते हे कळत असल्याने तो त्यापध्दतीने निती तयार करू शकतो त्यासाठी अशी नवी पिढी तयार होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केले.ते स्व.मनोहरभाई पटेल यांच्या 114 व्या जयंतीनिमित्त आयोजित स्वर्णपदक वितरण सोहळ्यात उदघाटक म्हणून बोलत होते.कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल पटेल होते.तर मंचावर अतिथि म्हणून विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले,गृहमंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री अनिल देशमुख,पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,अभिनेता सुनिल शेट्टी, आमदार विनोद अग्रवाल,सहसराम कोरेटे,मनोहर चंद्रिकापुरे,राजु कारेमोरे,प्रकाश गजभिये,माजी खासदार डाॅ. खुशाल बोपचे,मधुकर कुकडे,माजी मंत्री भरतभाऊ बहेकार,नाना पंचबुध्दे,बंडु सावरबांधे,नगराध्यक्ष अशोक इंगळे,माजी आमदार रामरतन राऊत,सेवक वाघाये,हरिहरभाई पटेल, मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल,भंडारा जिप अध्यक्ष रमेश डोंगरे,भंडारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे,माजी.जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर,प्रजय पटेल,समर्थ पारेख,नमित सोनी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात स्व.मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आली.सैनिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.यावेळी बोलतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल म्हणाले की स्व मनोहरभाईंनी आपल्या जिवन काळात शिक्षणासाठी केलेल्या कार्यामुळेच गोंदिया भंडारा जिल्ह्यात शिक्षणाची ज्योत पेटवली.या जिल्ह्यातील विद्यार्थी आज देशविदेशात मोठ्या पदावर पोचले आहेत ते गोंदिया शिक्षण संस्थेमुळेच.१९५६ पर्यंत एकच मनरो ही एकमेल व शाळा होती.मनोहरभाई शिक्षित नव्हते परंतु इतरांना शिक्षण कसे उपलब्ध होईल यावर भर देत शाळा सुरू केल्या.त्यापैकी २३ शाळा जिल्हा परिषद अस्तिवात येताच दान केल्या.सिंचनावरही त्यांनी भर दिला.या दोन्ही जिल्ह्यात विकास कामाची खुप गरज आहे.गेल्या ५ वर्षात जे काम व्हायला पाहिजे होते ते झाले नाही.त्या कामांना गती देण्याची जबाबदारी सर्वांची आहे.येत्या २ वर्षात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुसज्ज इमारत पुर्ण करणार अशी घोषणा करीत धापेवाडा टप्पा २ व ३ च्या कामालाही गती देण्याची गरज असल्याचे पटेल म्हणाले.
पटेल पुढे म्हणाले की, पर्यटन व पर्यावरणाचा गोंदिया जिल्ह्याला लाभ मिळवून द्यावे यासाठी आम्ही निुयोजन देऊ आपण शासनस्तरावर सहकार्य करा असे आदित्य ठाकरेना म्हणाले.स्व.राजेश पायलट सारखे व्यक्तींची आज काँग्रेसला खरी गरज आहे.ते जमिनस्तरावरील नेते होते.महाराष्ट्रात नवा प्रयोग यशस्वी होईल कारण चांगल्या मुद्यावर हे पक्ष एकत्र आले आहेत.येत्या काळात त्याचे चांगले परिणाम समोर बघायला मिळतील असे म्हणाले.
राज्याचे गृहमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख म्हणाले की महाविकास आघाडीचे सरकार ५ वर्ष चालेल त्यामुळ मुंगेरीलालचे स्वप्न बघणार्याचे स्वप्नच राहणार आहे.पोलीस भरती लवकर सुरू होणार आहे युवकांनी त्यासाठी तयारी सुरू करावी.अवैध सावकारी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात असल्याने त्यावर कारवाई होणार,अवैध सावकाराकडून घेतलेले पैशाचे व्याज शेतकर्याला द्यायचे गरज नसल्याचे म्हणाले.तसेच २ लाखाच्यावरील कर्ज माफ करण्यासाठी सरकार विचार करत आहे.
विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले म्हणाले की,धापेवाडा टप्पा २ येत्या जूनमध्ये पुर्ण होईल तर तिसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे.शिक्षणात अजून पुढे जाण्याची गरज आहे यात बेरोजगारी दूर करण्यासाठी टेक्नीकल शिक्षणाची गरज आहे त्यासाठी शिक्षण संस्थेने पुढाकार घ्यावा.मी या शिक्षणसंस्थेचा विद्यार्थी आहे याचा अभिमान असून विधानसभेत चांगले काम करणार तसेच दोन्ही जिल्ह्यातील पोलीस क्वार्टरकरीता निधीची तरतूद करण्याची सुचना केली.
पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की,चांगल क॓म्पस बघून आपण विदेेशात असल्याचा भास होतो हे टिकवून ठेवण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे आहे.पदक मिळवणे हा त्यांनी केलेल्या अभ्यासाचे गमक होय.प्रफुलभाईनी वडिलांचा वारसा जोपासत ठेवत त्यांनी मुंबईत राहूनही दिलेले लक्ष व संपर्काचे सात्यत महत्वाचे आहे,अन्यथा काही लोक मुबंईत येऊन गावाला विसरतात मात्र प्रफुलभाई हे अपवाद ठरले.प्रत्येक गावापर्यत चांगल्या दर्जाचे शिक्षण पोचले पाहिजे.महाराष्ट्रासाठी शिक्षण गरुड झेप ठरू शकते.अच्छे दिनाची नव्हे तर चांगल्या लोकांची ही सरकार आहे.अभिनेता सुनिल शेट्टी यांनीही विचार व्यक्त केले.संचालन माजी आमदार राजेंद्र जैन व जि प गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी केले.राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.