गोंदिया,दि.१२.: गोंदिया भारत स्काऊट आणि गाईड्स जिल्हा संस्था गोंदियाच्यावतीने ११ ते १४ फेबु्रवारी दरम्यान गोरेगाव तालुक्यातील परशुराम विद्यालय मोहगाव (बुज.) येथे जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन बुधवारला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक मंगेश qशदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजय रहांगडाले, सहषराम कोरोटे, मनोहर चंद्रीकापुरे, माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, जि.प. सभापती विश्वजीत डोंगरे, लता दोनोडे, शैलजा सोनवाने, रमेश अंबुले, गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प.सदस्य पी.जी.कटरे, सरपंच हेमलता हरिणखेडे, उपसरपंच सुनील रहांगडाले, जगदीश येरोला, प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी उपस्थित राहणार आहेत.
सांस्कृतीक कार्यक्रमाचे उद्घाटन पं.स.सभापती माधुरी टेंभरे यांच्या हस्ते गौरीशंकर पारधी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. शेकोटी कार्यक्रमाचे उद्घाटन उपसभापती लिनाताई बोपचे यांच्या हस्ते पंचायत समिती सदस्य राणी रहांगडाले यांच्या हस्ते होणार आहे. १३ फेबु्रवारीला सकाळी ९ वाजता प्रदर्शनी, बिन भाड्यांचा स्वयंपाक, हस्तकला कौशल्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २ वाजता शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
१४ फेबु्रवारीला सकाळी ११ वाजता बक्षीस वितरण कार्यक्रम आमदार विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. उपाध्यक्ष अल्ताफ हामीद, जिल्हा क्रीडा अधिकारी अब्दुल मुस्ताक, रविकांत बोपचे, नगराध्यक्ष आशिष बारेवार, जि.प. सदस्य राजेश भक्तवर्ती, स्काऊट गाईड अध्यक्ष ममता झा, शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कछवे, राजकुमार हिवारे, उपशिक्षणाधिकारी सुनील मांढरे, आर.पी.रामटेके उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचा गावकèयांनी व जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी-शिक्षकांनी लाथ घ्यावा असे आवाहन संयोजक बी.डब्ल्यू.कटरे, एम.पी.शेख, डी.डी.चौरागडे, श्रीमती व्ही.बी. भिवगडे, आर.सी.बिरनवार, भारती कटरे यांनी केले आहे.





