गोंदिया,दि.१२.:तालुक्यातील बटाणा येथील शारदा मुन्नालाल हरिणखेडे या मुंबई येथे पार पडलेल्या मिस महाराष्ट्र आयकॉनिक डिवा २०२० मध्ये द्वितीय क्रमांकावर राहिल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.आयोजक कविता किशोर,जयश्री रगडे,मीनल पवार,डॉन्स इंडियाचे जयकुमार नायर आदी होते.परिक्षक म्हणून नृत्यदिगदर्शिक गिता कपुर,विशाल कपुर,अभिनेते राहुल राय,सुफी गायिका व जयqवदर नरुला उपस्थित होते.या स्पर्धेचा ताज अमरदिप कौर यांच्या हस्ते शारदा यांना घालण्यात आला.आपल्या यशाचे श्रेय शिक्षक वडील मुन्नालाल हरिणखेडे,आई जिवनकला हरिखेडे तसेच कुटुबियांना दिले आहे.





