35.6 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home Top News ईतर मागास वर्ग विभागाचे नाव बदलून बहुजन कल्याण विभाग ठेवण्यात आले, यास...

ईतर मागास वर्ग विभागाचे नाव बदलून बहुजन कल्याण विभाग ठेवण्यात आले, यास राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध…!

0
48

गोंदिया,दि.13 :ईतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणी विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग या विभागाचे नाव बदलून आता बहुजन कल्याण विभाग असे करण्यास आज (दि.12 फरवरी 2020) च्या झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयाला राष्ट्रीय ओबीसी महासंघ, गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीने विरोध केला आहे.
ईतर मागासवर्ग समाज हा बहुसंख्य समाज आहे. या समाजाच्या विभागाचे नाव बदलविणे हे या समाजाच्या अस्तित्वावर घाला घालण्यासारखे आहे. आता ईतर मागास वर्गाचे नाव बदलून बहूजन असे लिहीने म्हणजे ईतर मागास वर्गाचे स्वतंत्र अस्तित्व मिटविण्यासारखे आहे.केंद्रामधे ओबीसी, एस.सी. एस.टी, ही तीनच प्रवर्ग आहेत. केन्द्रात ओबीसी (ईतर मागास प्रवर्ग) मधे विमुक्त जाती, भटक्या जमाती आणी विशेष मागास प्रवर्ग यांचा समावेश होतो व या सर्व जाती ओबीसी (ईतर मागास प्रवर्ग) म्हणूनच संबोधल्या जातात.
दि. 8 डीसेंबर 2016 ला नागपुर येथील हीवाळी अशिवेशनावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने काढलेल्या ओबीसी समाजाच्या भव्य मोर्चानंतरच ओबीसी मंत्रालयाची स्थापणा करण्यात आली होती.
भटक्या जमाती, विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग आणी ईतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, असे सुरवातीला ठेवलेले विभागाचे नाव बदलून ईतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणी विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग असे करण्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघाने भाग पाडले होते.
म्हणून ईतर मागास वर्ग विभागाचे नाव बदलून बहुजन कल्याण विभाग करण्यात येवू नये. सरकारला जर हे नाव मोठे वाटत असेल तर या विभागाचे नाव ‘ओबीसी कल्याण विभाग’ करावे. सात दिवसात जर सदर निर्णय बदलविण्यात आला नाही तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ ‘जनआंदोलन’ करेल, असा ईशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, कार्याध्यक्ष डॉ. खुशालचंद्र बोपचे,समन्वयक प्रा.अशोक जिवतोडे, महासचिव सचिन राजूरकर, सहसचिव  खेमेन्द्र कटरे,उपाध्यक्ष प्रा शेषराव येलेकर,मनोज चव्हाण, गोपाल सेलोकर,गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती जिल्हाध्यक्ष बबलू कटरे,  अमर वराडे,मनोज मेंढे,लक्ष्मण नागपूर,कैलास भेलावे,शिशिर कटरे,उध्दव मेहंदळे,मनोज डोये,लिलाधर गिर्हेपुंजे,दिनेश हुकरे,अशोक लंजे,गौरव बिसने,शकील पटेल, सुषमा भडं, कल्पनाताई मानकर, रेखाताई बाराहाते, सुभाष जाधवर, भंडारा जिल्हा ओबीसी महासंघ अध्यक्ष खुशाल शेंडे,अजय तुमसरे, रविकांत वरारकर, विजय पिदुरकर, रुचीत वांढरे,पुष्पा खोटेले, नीलेश खोडे, व ओबीसी समाजाने दिला आहे