37.9 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home विदर्भ आदिवासी गोवारी समाज संघटनेतर्फ़े कैलाश राऊत यांचे स्वागत

आदिवासी गोवारी समाज संघटनेतर्फ़े कैलाश राऊत यांचे स्वागत

0
48

गोंदिया,दि.14 : आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्रचे प्रदेश अध्यक्ष कैलाश राऊत यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केले. त्यांच्या प्रवेशानंतर प्रथमच त्यांचे गोंदियात आगमन झाले. दरम्यान त्यांच्या आगमनावर समाज संघटनेच्या जिल्हा कार्यालयात शहर अध्यक्ष सुशिल राऊत यांच्या नेतृत्वात कैलाश राऊत यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला.
आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्रचे प्रदेश अध्यक्ष कैलाश राऊत यांनी ना.जयंत पाटील, राज्याचे गृहमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे  पालकमंत्री अनिल देशमुख, मंत्री हसन मुश्रीफ तथा पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान त्यांचे प्रथमच गोंदिया आगमन झाले. यावर आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्रचे शहर अध्यक्ष सुशिल राऊत यांच्या नेतृत्वात  जिल्हा कार्यालयात त्यांचे भव्य स्वागत करून सत्कार करण्यात आला. यावेळी सुशिल राऊत यांच्यासह रिपाई (आ) चे उपाध्यक्ष भाऊ गजभिये, भागरताबाई राऊत, प्रभाकर बागडे, साधना राऊत, विनोद पडोती, रिंकू वाघाडे, प्रमोद राऊत, राहुल वाघाडे, सुनिता राऊत, प्रेमलाल शहारे, अरविंद राऊत, प्रकाश फुन्ने, शारदाताई नेवारे यांच्यासह आदिवासी गोवारी समाज संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.
०००००