35.6 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home विदर्भ ओबीसी जनगणनेकरीता आमगावात निघाली भव्य जनगणना रॅली

ओबीसी जनगणनेकरीता आमगावात निघाली भव्य जनगणना रॅली

0
44

जनगणना जागृती अभियान यात्रेला आमगाव तालुक्यात प्रतिसाद *

आमगाव,दि.14 – ओबीसी संघर्ष कृती समिती गोंदिया जिल्हा,राष्ट्रीय ओबीसी महासंघ,ओबीसी सेवा संघ व ओबीसी अधिकारी-कर्मचारी महासंघाच्यावतीने जनगणनेत ओबीसींचा रकाना तयार करण्यात यावा या मागणीला घेऊन आज शुक्रवारला दि.१४ येथील कामठा चौकातून ओबीसी विद्यार्थी,कर्मचारी,अधिकारी वओबीसी समाजबांधवाची भव्य रॅली काढण्यात आली.ओबीसी जनगणना जागृती रॅलीचे नेतृत्व ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.बी.एम.करमकर यांनी केले.ओबीसीची जनगणना करा अन्यथा आमचा बहिष्कार या घोषणेसह परिसर दणाणून सोडला.र॓लीचे तहसिल कार्यालय परिसरात आगमन होताच सभेत रुपातंर झाले. सभेच्या सुरवातीला पुलगामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.blank

यावेळी बोलतांना विजय शिवणकर म्हणाले, ८० टक्के समाजा ला ५० टक्के प्रतिनिधीत्व मिळते तर २० टक्के समाजाला ५० टक्के प्रतिनिधित्व मिळते यावरून विचार करा,यासाठी लढा तिर्व करण्याची गरज आहे यासाठी प्रत्येक ओबीसींनी रस्त्यावर यायला हवे.हा लढा एकट्या संघटनेचा नव्हे तर समाजातील प्रत्येकाचा आहे. तर जिल्हाध्यक्ष बबलू कटरे म्हणाले की,सविंधानिक लढाई आमची आहे घटनेच्या ३४० व्या कलमानुसार आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळावे असी तरतुद असताना आमची मात्र जनगणनाच केली गेली नाही.जनगणना न झाल्याने शिक्षणात,नोकरीसह संसद व विधानसभेत हिस्सा मिळाला नाही.संख्येच्या आधारावर हिस्सा मिळत असताना आमची मात्र संख्याच मोजली गेली नाही.मेरीटच्या आधारावर हिस्सा मिळत नाही हे समाजाने जानून घेण्याची वेळ आली आहे व जनगणना होणे हा आमचा अधिकार आहे.यावेळी बोलतांना जमीलभाई पठाण म्हणाले की आम्ही सर्वांनी राजकीय पक्ष बाजुला सोडून आपल्या हक्कासाठी संघटित व्हावे लागेल.सविधानांतील तरतुदीनुसार आमची जनगणना करायला हवे.सुधाभाऊ शिवणकर म्हणाले की,गोर्या इंग्रजानी जनगणना केली परंतु या देशातील काळ्या इंग्रजांनी मात्र ओबीसीची जनगणना टाळली.

blankओबीसी संघर्ष कृती समितीची जनगणना जागृती यात्रा १३ फेब्रुवारीला आमगाव तालुक्यात दाखल झाली. पदमपूर येथून रथयात्रेला सुरवात करू तालुक्यातील पदमपुर — बामणी- बोरकन्हार- अंजोरा – कवडी- वडद- सोनेखारी- तिगाव तिगाव- फुक्कीमेटा- जामखारी – बिरसी – गोरठा- ठाणा या गावामंध्ये जाऊन जनजागृती करण्यात आली. असून शेवटची सभा ठाणा येथे घेण्यात आली. आमगाव तहसील कार्यालयासमोरील सभेऩंतर यात्रा किकरीपार – कालीमाटी- भोसा- सुपलीपार- करंजी- सितेपार – चिरचाळबांध- दहेगाव या गावाकडे ही यात्रा रवाना झाली. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे,ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.बी.एम.करमकर,प्रदेश उपाध्यक्ष सावन कटरे, ओबीसी संघर्ष कृती समितीचे कोषाध्यक्ष कैलास भेलावे,माजी जिप अध्यक्ष विजय शिवणकर,शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेंद्र नायडू,भाजप महिला आघाडी पदाधिकारी मोहिनि निबा़र्ते,सुधाभाऊ शिवणकर,जंमीलभाई पठाण,जनार्दन शिगाडे,निलकंठ बिसेन,एस.डी.बागडे,महेश उके,संजय बहेकार,राजेश सातनुरकर, तालुकाअध्यक्ष लिलाधर गिर्हेपुंजे,ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष हरिष ब्राम्हणकर,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष क्रांती ब्राम्हणकर ,काशीनाथ हुकरे,विनायक येडेवार,तालुकाध्यक्ष सुरेंद्र मेंढे,डाॅ.गुरुदास येडेवार,प्रा.कमलबापू बहेकार,नरेंद्र शिवणकर,भुमेश शेंडे,दिनेश तिरेले,गौरव बिसने,प्रकाश बोपचे,राजु मेंढे,मुकेश,उजवने,मनोज डोये,प्रकाश ब्राम्हणकऱ महेंद्र चव्हाण,एन.बी.चव्हाण,तिरथ येटरे,प्रमोद शिवणकर,योगेश रामटेके,रवि फुंडे,एस.जू.मेंढे,एस.एफ.कटरे,विद्यार्थी संघसचिव आनंद रहागंडाले मान्यवर उपस्थित होते.संचालन विनायक येडेवार यांनी केले तर प्रास्तविक तालुकाध्यक्ष हरिष ब्राम्हणकर यानी केले.आभार कृष्णा बहेकार यांनी मानले.ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ,संभाजी ब्रिगेड,मराठा सेवासंघासह बहुजन संघटनाचे पदाधिकारीसह मोठ्या संख्येने विद्यार्थी व ओबीसी समाजबांधव उपस्थित होते.