37.9 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home विदर्भ प्रतापगड येथे २१ फेब्रुवारीला महादेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

प्रतापगड येथे २१ फेब्रुवारीला महादेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

0
89

गोंदिया, दि.15ः- सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेले व निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेले अर्जुनी मोर तालुक्यातील प्रतापगड तीर्थक्षेत्र पंचक्रोशित प्रसिद्ध आहे. हे तीर्थक्षेत्र शिवभक्तांसाठी श्रद्धेचे स्थान आहे.येथील महादेवाची विशाल मूर्ती भाविकांना आकर्षित करणारी आहे.२५ जुलै २०१९ रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसादरम्यान वीज पडल्याने विशाल मूर्ती भंगली होती. भाविकांच्या भावना लक्षात घेऊन नाना पटोले मित्र परिवाराने पुढाकार घेऊन पंचधातूची महादेवाची विशाल मूर्ती तयार केली आहे. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २१ फेब्रुवारीला होणार आहे. परिसराच्या सौंदर्यीकरणासार्ठीींशासनाकडून मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.प्रतापगड देवस्थानाला धार्मिक,ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व आहे.येथे वर्षभर भाविक व पर्यटकांची वर्दळ असते. महाशिवरात्रीच्या यात्रेसाठी लाखो भाविक येत असतात. येथील विशाल महादेव मूर्ती भाविकांना आकर्षित करणारी होती. मात्र, २५ जुलै रोजी रात्री मुसळधार पावसात पडलेल्या विजेमुळे महादेव मूर्ती भंगली. मूर्ती विशेषज्ञ व प्रयोगशाळेने या घटनेला नैसर्गिक घटना ठरविले होते. या घटनेमुळे शिवभक्तांच्या भावनांना धक्का बसला होता. त्यामुळे नवीन शिवमूर्ती लवकरात लवकर स्थापन करून प्राणप्रतिष्ठा करण्याची मागणी भाविकांनी केली. तत्कालीन राज्यमंत्री व पालकमंत्री डॉ. परिणय फुके,खासदार सुनील मेंढे यांनी मूर्ती जीर्णोद्धार व सौंदर्यीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तत्काळ २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. यंदाच्या महाशिवरात्री उत्सवापूर्वीच भाविकांना नवीन महादेव मूर्तीचे दर्शन घडावे, यासाठी नाना पटोले मित्र परिवाराने पुढाकार घेतला. चार महिन्यांपूर्वी मूर्ती तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली. मूर्ती तयार झाली आहे.यासंदर्भात अशोक चांडक यांनी सांगितले की, पंचधातूपासून नवीन मूर्ती तयार करण्याचा निर्णय नाना पटोले मित्र परिवारातर्फे घेण्यात आला. मूर्तीसाठी २० ते २२ लाखांचा निधी खर्च झाला असून, परिसर सौंदर्यीकरणाचे काम महाशिवरात्री यात्रेनंतर करण्यात येणार आहे. नांदेड येथील मूर्तिकार व्यंकटी बाबूराव गीते व त्यांचे सहकारी मूर्तिकार तुकाराम पांचाळ, रंगकर्मी बालाजी नागुराव बुटे व त्यांचे २५ सहकारी गत ४ महिन्यांपासून मूर्ती तयार करीत आहेत. सोने, तांबे, चांदी, पितळ, शिसम धातूसह सिमेंट व लोखंडापासून शास्त्रोक्त पद्धतीने मूर्ती तयार करण्यात आली आहे. मूर्तीची उंची २२ फूट व रुंदी १५ फूट आहे. महाशिवरात्री उत्सवादरम्यान १९ फेब्रुवारी रोजी पूजन, २० फेब्रुवारी रोजी हवन केल्यावर २१ फेब्रुवारी रोजी महादेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह गणमान्य व्यक्ती उपस्थित राहणार असल्याचे चांडक यांनी सांगितले. घ