37.9 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home राजकीय सभापती निवडणुकीत नगरसेवकांची बंडखोरी

सभापती निवडणुकीत नगरसेवकांची बंडखोरी

0
30

भंडारा,दि.15ः- ३३ सदस्य असणार्‍या भंडारा नगरपरिषदेच्या सभापती निवडणूकीत सत्ताधारी भाजपला चार समित्यांचे सभापती पद मिळाले असून पक्षाच्या ३ नगरसेवकांनी बंडखोरी केल्याने निवडणूक घेण्यात आली. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक सभापतीपद मिळाले.
भाजपला मिळालेल्या समित्यांमध्ये बांधकाम समिती सभापतीपदी उपाध्यक्ष दिनेश भूरे, पाणीपुरवठा समिती सभापतीपदी मधुरा मदनकर, नियोजन समिती सभापतीपदी आशिष गोंडाणे तसेच शिक्षण समिती सभापतीपदी शमीमा शेख यांची बिनविरोध निवड झाली. स्थायी समितीपदी कंवलजीतसिंग चढ्ढा, संजय कुंभलकर यांची बिनविरोध निवड झाली.
पक्षाच्या व्हीपविरोधात नगरसेवक नितेश धकाते, साधना त्रिवेदी आणि कल्पना व्यास यांनी बंडखोरी केल्याने निवडणूक घ्यावी लागली. यामध्ये स्वच्छता वैद्यक आणि सार्व. आरोग्य समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश ठाकरे तसेच महिला, बालकल्याण समिती सभापतीपदी काँग्रेसच्या जयश्री बोरकर विजयी झाल्या.
विजयी सदस्यांचे अभिनंदन केल्यानंतर नगराध्यक्ष खा. सुनील मेंढे म्हणाले की, नवनिर्वाचित सभापतींच्या मदतीने भंडारा नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराचे विकासकार्य पुढील काळात जोमाने सुरु राहणार असून पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या सदस्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.