35.6 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home विदर्भ ओबीसी जनगणनेकरीता गोरेगावात निघाली भव्य जनगणना रॅली

ओबीसी जनगणनेकरीता गोरेगावात निघाली भव्य जनगणना रॅली

0
43

जनगणना जागृती अभियान यात्रेला गोरेगाव तालुक्यात प्रतिसाद 

गोरेगाव,दि.१५ः~- गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती,राष्ट्रीय ओबीसी महासंघ,ओबीसी सेवा संघ व ओबीसी अधिकारी-कर्मचारी महासंघाच्यावतीने जनगणनेत ओबीसींचा रकाना तयार करण्यात यावा या मागणीला घेऊन आज शनिवारला दि.१५ येथील ठाणा चौकातून ओबीसी विद्यार्थी,कर्मचारी,अधिकारी वओबीसी समाजबांधवाची भव्य रॅली काढण्यात आली. ओबीसी जनगणना जागृती रॅलीचे नेतृत्व ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,खेंमेद्र कटरे, रेखलाल टेंभरे, पी.जी.कटरे, डेंमेंद्र रहागंडाले, कैलाश भेलावे,गुड्डू कटरे,चौकलाल येडे, हरिराम येरणे, कमल हटवार, केवल बघेले, नगरपंचायत सभापती रेवेंद्र रहांगडाले, आदीच्या नेतृत्वात काढण्यात आली.

ओबीसी संघर्ष कृती समितीची जनगणना जागृती यात्रा १५ फेब्रुवारीला गोरेगाव तालुक्यात जनजागृती यात्रा दाखल होत शालेय विद्यार्थी,ओबीसी समाज नागरिक,कर्मचारी आदीची रॅली तहसील कार्यालयात दाखल झाली त्यानंतर आयोजित सभेत मान्यवरांनी विचार व्यक्त केले.त्यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष डाॅ.खुशाल बोपचे,ओबीसी सेवा संघाचे उपाध्यक्ष सावन कटरे, ओबीसी संघर्ष कृती समितीचे कोषाध्यक्ष कैलास भेलावे,सचिव चौकलाल येडे,
माजी जिप सभापती पी.जी.कटरे,जिल्हा बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे,भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहागंडाले,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केवल बघेले,एल.एस.तुरकर,कर्मचारी संघटनेचे सयोंजक हरिराम येरणे,काँग्रेस तालुकाध्यक्ष

blank

डेमेंद्र कटरे,सरंपच संघटना अध्यक्ष सोमेश रहागंडाले,शशी भगत,हिदायत शेख,कमल हटवार,क्रृषीपाल टेंभरे,लिलाजी डहारे,राहुल कटरे,जितेंद्र कटरे,कमलेश बारेवार,बाबा बोपचे,लिलेश रहागंडाले,दिलीप चव्हाण,डाॅ.रूपसेन बघेले,आर.आर.अगडे,सी.पी.बिसेन,श्री फुंडे,
विद्यार्थी संघसचिव गौरव बिसने,घनश्याम पारधी,राजू पारधी,लेखु रहागंडाले,लालचंद चव्हाण,धनराज ठाकरे,घनश्याम कावळे,उत्तम टेंभरे,रामभाऊ अगडे,प्रतिक येळणे,किशोर पटले,विनोद पारधी,टेकेश्वर रहागंडाले,सुधीर येळे,हितेंद्र पारधी,प्रेमलाल डोनेकर, सहमान्यवर उपस्थित होते. प्रास्तविक व संचालन राष्ट्रिय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे यानी केले.तर आभार तालुकाध्यक्ष लोकेश तुरकर यांनी मानले.एमसीपी विद्यालय,
जगत महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी,
ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ,संभाजी ब्रिगेड,मराठा सेवासंघासह बहुजन संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.