गोंदिया,दि.17ःगौतम बुद्ध यांच्या नावाने भारताची ओळख शांतिप्रिय अशी शोभते. शांतिप्रिय देश ही ओळख म्हणजे देशाला गौतम बुद्ध यांचा वारसा लाभला त्यामुळेच मिळाली आहे. बुद्धांच्या संकल्पनेत शांतिप्रिय, समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग लाभतो, असे विचार आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केले. जीवनात शांतता आणि समृद्धी मिळवण्यासाठी गौतम बुद्ध यांच्या सिद्धांत अमंलात आणावे असेही आमदार अग्रवाल हे बोलले. ते कोरणी घाट पर्यटन बुद्धिस्ट समिती गोंदिया मार्फत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या सीमेवर असलेल्या जिरूटोला येथील कोरणी घाट येथे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अर्जुनी / मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती दर्शवली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एड. एच. डी. सूर्यवंशी उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य श्यामकला पाचे, धामणगाव ग्रामपंचायत सरपंच भजनलाल ठाकरे, बुद्धिस्ट पर्यटन महोत्सव कमिटीचे संयोजक ओमकार मेश्राम इत्यादी मंडळी मंचावर उपस्थित होती. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून जनमित्र चिचखेडे एड. एच.डी. सूर्यवंशी, केशवराव वाहने, दुर्योधन गजभिये, राजेश मेश्राम, एम. टी. कोटांगले उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता भीमराज वासनिक, प्रभाकर गजभिये, सी. आर. टेम्भूर्णे, एम. बी. राऊत, नरेश बोंबार्डे, तीर्थराज दहाट, अशोक चव्हाण, प्रीतम मेश्राम, आनंद लांजेवार इत्यादी मंडळींनी परिश्रम घेतले.





