38.9 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home विदर्भ पोलीस पाटील हा गावच्या स्थानिक पातळीवर महत्त्वाचा दुवा :- शामराव काळे

पोलीस पाटील हा गावच्या स्थानिक पातळीवर महत्त्वाचा दुवा :- शामराव काळे

0
52

आमगाव,दि.16:- पोलीस पाटिल हे शासनाचे कान व डोळे असून गावपातळीवर काम करण्यासाठी महत्वपूर्ण योजना जनतेपर्यंत पोचविण्यासाठी पोलीस पाटिल हा महत्वाचा दुवा आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी व्यक्त केले.ते सेवानिवृत्त पोलीस पाटील यांच्या सत्कार समारंभा प्रसंगी बोलत होते.
स्थानिक मासिक सभेचे औचित्य साधुन ठाणाटोला येथील सेवानिवृत्त पोलीस पाटिल आत्माराम गायधने यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक शामराव काळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय सिंग, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद थिटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी घोरपडे, पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा पठाडे, पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षा नर्मदाताई चुटे, जिल्हा प्रचार प्रमुख प्रदीप बावनथडे तालुका अध्यक्ष सुरेश कोरे उपस्थित होते.सत्कार कार्यक्रम प्रसंगी पोलीस पाटील सुरेश कोरे यांनी सेवानिवृत्त पाटलाच्या कार्यकालवर प्रकाश टाकून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी पोलीस पाटील संजय हत्तीमारे, किशोर दोनोडे,गिरधारी रहिले,अशोक भांडारकर,प्रदीप चुटे,लोकचंद भांडारकर, राजेश बन्सोड, खेमेश्वरी बोळणे सरिता मेढे, शकुन्तला पाथोडे,शिला रहिले, सुलोचना बहेकार,चंद्रकला हरिणखेडे, देवेश्वरी पारधी, संजय पुंड, तसेच आमगाव तालुक्यातिल सर्व पोलीस पाटिल व पोलीस स्टेशन आमगाव चे कर्मचारी उपस्थित होते.