अर्जुनी मोर.,दि.17ःमहाराष्ट्र राज्यात अनेक थोर संत महात्मे होवुन गेले.त्यांचे सत्कार्य ,विचार व आशिर्वाद सर्वांना प्रेरणादायीच ठरलेले आहेत. संत गजानन महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत.त्यांचे आचार,विचार प्रत्येक मानवाने अंगीकारावे असे धार्मिक आवाहन अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी केले आहे.
अर्जुनी मोर तालुक्यातील सुकळी/ खैरी येथे ( दि.14 ) संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आयोजित गोपाल काला कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन आम.मनोहरराव चंद्रिकापुरे बोलत होते.यावेळी जि.प.सदस्य गिरीष पालीवाल, युवा काॅग्रेस नेते निशांत राऊत, अनिल दहिवले, नगरसेवक माणिक घनाडे, बाबुराव गावराने,लिलाधर मडावी, सरपंच लालसिंह चंदेल, व अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
उपस्थित भाविक भक्तांना मार्गदर्शन करताना आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे म्हणाले की सुसंस्कारीत पिढी घडविण्यासाठी थोर संत व महापुरुषांच्या विचारांचा सुगंध प्रत्येक घरी दरवळला पाहीजे. अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रातील जनतेने मला निवडुन देवुन आपली सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्व मतदार बंधु ,भगीणिंचे मनःपूर्वक आभार मानतो. आणी या संतांच्या भुमीतुन या भागाचा सर्वांगीण विकास करण्याची ग्वाही देतो असे आश्वासनही आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी दिली.





