41.1 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home विदर्भ डोकेसरांडी येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

डोकेसरांडी येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

0
42

लाखांदूर,दि.17ः- तालुक्यातील डोकेसरांडी येथे(दि.१५) तालुका विधी सेवा समितीच्यावतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्री.कोठारी  यांच्या हस्ते करण्यात आले.दर रविवारला स.११ ते दु. २ पर्यंत अँड. मोहन राऊत  व स्वयंसेवक मानसी म. बगमारे यांची नियुक्ती या शिबिरासाठी करण्यात आली. कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून  न्यायाधीश तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष न्या.साबळे, अँड. एंचिलवार, अँड. मोहन राऊत, श्री. भेडारकर तालुका संरक्षण अधिकारी लाखांदूर, अँड. झोडे, अँड.जे.डी.राऊत यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले.प्रास्ताविक अँड. मोहन राऊत यांनी केले तर संचालन घनश्याम अलोने यांनी केले. आभार लंजे सर यांनी मानले. यावेळी पोलीस अधिकारी कुरसुंगे, प्राचार्य राठोड,सरपंचा सौ. तोंडरे  व गावकरी मंडळी तथा शिवाजी विद्यालय डोकेसरांडी येथील शिक्षकगणं व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.