अर्जुनी मोर,दि.17ःराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अर्जुनी मोर.च्या दिनदर्शिकेचे विमोचन (दि.15 ) अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांचे हस्ते नवेगाव बांध येथील शासकीय विश्रामगृहात करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य किशोर तरोणे, अर्जुनी मोर. तालुका काॅग्रेस अध्यक्ष भागवत नाकाडे, राष्टवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, काॅग्रेसचे युवा नेते निशांत राऊत, सरपंच संघटनेचे अध्यक्ष हेमकृष्णा संग्रामे, अनिल दहिवले, यशवंत गणविर, आर.के.जांभुळकर, राकेश लंजे,कलीराम काटंगे, राजकुमार जैन,इंद्रदासजी झिलपे,सुभाष देशमुख,तथा तालुक्यातील राष्टवादी काँग्रेस व काॅग्रेसचे शेकडो कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.





