37.9 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home शैक्षणिक विद्यार्थ्यांना सर्वगुण संपन्न करण्यात भारत स्काऊट गाईडचा मोठा सहभाग-माजी खासदार.बोपचे

विद्यार्थ्यांना सर्वगुण संपन्न करण्यात भारत स्काऊट गाईडचा मोठा सहभाग-माजी खासदार.बोपचे

0
56

गोरेगांव दि.17ः- विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासासह ,ते संस्कारक्षम कसे बनतील हा विषय शिक्षण क्षेत्रात बहुतांश वेळा चर्चेला असतो.विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वावर शाळेतील घटकांचा प्रभाव अपेक्षित आहे.परंतु दुर्दैवाने तसे न होता. बाहेरील घटक जास्त प्रभावशाली असल्याचे अनुभवाला येते.परिणामी तो सम्बंधित विद्यार्थी असामाजिक व असंविधानीक तत्वांना अंगीकारतो.यामुळे तो शाळेत उत्साही राहत नाही व तो मुळ उदिष्टापासून दूर दूर जातो. या मोठ्या समस्येचे निराकरण फक्त संस्कारक्षम अध्यापनच करू शकते.भारत स्काऊट गाईड चळवळीत नेमके हे साध्य होते.स्वावलंबन,आपत्ती व्यवस्थापन,समस्या निरसनास्तव सदैव तयार असने,सदाचार,नैतिकता,शिष्टाचार,सांस्कृतिक विकास ,सेवा वृत्ती यासह विद्यार्थ्यांना संस्कारीत करण्यासाठी विविध उपक्रमाचा समावेश भारत स्काऊट गाईड चळवळीत असल्यामुळे भारत स्काऊट हा विषय प्रत्येक शाळेने स्विकारून त्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणेेेे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे यांनी केले.
ते स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. गोंदिया भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा संस्था गोंदिया ,शिक्षण विभाग (माध्यमिक व प्राथमिक),शहिद जान्या तिम्या जि.प.हायस्कूल व क.महा.गोरेगांव व परशुराम विद्यालय मोहगांव(बुज.) यांच्या संयुक्त विद्यमानाने ता.11ते 14 फेब्रुवारी पर्यंत मोहगांव (बुज)या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 11फेब्रुवारीला या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.राजा दयानिधी यांच्या हस्ते पार पडले.blank
याप्रसंगी माजी शिक्षण सभापती व जि.प.सदस्य पी.जी.कटरे,माजी जि.प.सदस्या सीताबाई रहांगडाले,से.नि.शिक्षणाधिकारी(माध्य.)तथा गोंदिया भारत स्काऊट गाईड च्या अध्यक्षा ममता झा,जि.प.चे शिक्षणाधिकारी(प्राथमिक)राजकुमार हिवारे,गोरेगांव प.स.सभापती माधुरी टेंभरे, शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष गौरीशंकर पारधी,प.स.सदस्या राणीताई रंहागडाले,जि.प.शाळा मोहगांवचे व्यवस्थापन समीती अध्यक्ष प्रकाश पटले,कृउबा सदस्य दशराम साऊसकर,गोरेगांव प.स चे गटशिक्षणाधिकारी पी.बी.भांडारकर,स्काऊट गाईडचे आजिवन सदस्य तथा से.नि.प्राचार्य दिनेश रंहागडाले,मेळावा संयोजक मुख्याध्यापक बी.डब्लु.कटरे,मुख्याध्यापक खुशाल कटरे ,मेळावा नियत्र॔क प्राचार्य एम.पी.शेख,गोंदिया स्काऊटचे जिल्हा आयुक्त व्हि.आर.भगत,जिल्हा चिटणीस जी.एस.चिंधालोरे,केंद्र प्रमुख वाय.एल.रंहागडाले,गटसमन्वयक एस.बी.खोब्रागडे,मोहगांव तंमुस अध्यक्ष लेखराम पटले,गजानन रंहागडाले,भुमेश्वरी हरिणखेडे चुन्नीलाल उपराळे,रेखा पटले देवकराम हरिणखेडे,संगिताताई पारधी,से.नि.मुख्याध्यापक बी.ए.रंहागडाले,मोहगांवचे ग्रा.प.सदस्य कमलेश रंहागडाले,भुषणराव जैतवार,जतिराम मेश्राम ई.मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा मेळावा दरम्यान सांस्कृतिक,भव्य शेकोटी,प्रदर्शनी,बिनभांड्याचा स्वंयपाक,हस्तकला कौशल्य,विविध सामाजिक विषय दर्शविणारी झाकी,शोभायात्रा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
स्पर्धकांना बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले.उपरोक्त संपुर्ण कार्यक्रमांची प्रस्तावणा,संचालन व आभार गोंदिया भारत स्काऊट गाईड च्या जिल्हा संघटक मनिषा तराळे यांनी केले.
जिल्हा मेळावा यशस्विते साठी मेळावा प्रमुख मोहगांव चे डी.डी.चौरागडे,कुर्हाडी चे सौ.व्हि.बी.भिवगडे,सहाय्यक मेळावा प्रमुख मोहगांवच्या भारती कटरे,गोरेगांवचे आर.सी.बिरनवार यांनी आपल्या चमुसह परिश्रम घेतले.