37.9 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home विदर्भ ग्रा.प.कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचा-याप्रमाणे वेतनश्रेणी लागू करा- ग्रा.प.कर्मचाऱ्याचे आमदारांना निवेदन

ग्रा.प.कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचा-याप्रमाणे वेतनश्रेणी लागू करा- ग्रा.प.कर्मचाऱ्याचे आमदारांना निवेदन

0
45

तिरोडा,दि.17:- ग्रा.प. कर्मचारी स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक भाग असून ग्रा.प.कर्मचारी अनेक वर्षापासून करवसुली,शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविणे, साफसफाई व इतर ग्रामविकासाशी संभधीत कामे तुटपुंज्या वेतनावर करित असून मागील कित्येक वर्षापासून शासनाकडून वेतन व पेन्शनच्या प्रतीक्षेत आहेत.ग्रा.प.कर्मचा-यांना आगस्ट २०१३ मध्ये वेतनाबाबत सुधारित आदेश काढण्यात आले होते त्यानंतर पाच वर्षानंतर सुधारित दर निश्चित करने गरजेचे होते परंतु सात वर्षे लोटूनही अधिसूचना काढण्यात आलेली नाही त्यावर तत्काळ कार्यवाही करून किमान १८ हजार वेतन करण्यात यावे त्याचप्रमाणे फेब्रुवारी २०१४ च्या शासन निर्णयानुसार कर वसुलीसाठी ग्रामसेवक, सरपंच यांना जवाबदार न ठरविता ग्रा.प.कर्माचा-यांना जवाबदार ठरवून ग्रा.प.कर्मचा-यांना लक्ष ठरवून ५० टक्के अनुदान देण्यात येते हि अट रद्द करण्यात यावी.अशा मागण्यांचे निवेदन महराष्ट्र ग्रा.प.कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांनी आमदार विजय रहांगडाले यांचे दिले यावेळी संघटना जिल्हा कार्यकारिणी सहसचिव रविंद्र किटे,तालुका सचिव आशिष उरकुडे, तालुकाध्यक्ष धनेश्वर जमाईवार,जिल्हा सदस्या सुनीता ठाकरे, तालुका सदस्य सुनील फटिंग,प्रयागराज नंदर धने उपस्थित होते.