वाशिम, दि. २1 : युवक-युवतींच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा, या हेतूने नेहरू युवा केंद्र व राजरत्न अल्पसंख्यांक शिक्षण प्रसारक व बहुद्देशीय संस्थेच्यावतीने २४ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता लोकमान्य टिळक स्मारक भवन (जुनी रमेश टॉकीज), राजे वाकाटक वाचनालय जवळ, वाशिम येथे जिल्हा युवा संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील युवा कलावंतांनी पारंपारिक लोकनृत्य, नाटिका अशा विविध कलाप्रकारात सहभागी होण्याचे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक सम्यक मेश्राम यांनी केले आहे. उत्कृष्ट सादरीकरण करून सामाजिक संदेश देणाऱ्या प्रथम, द्वितीय क्रमांकांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व सहभागींना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. नोंदणी कार्यक्रमस्थळी तसेच नेहरू युवा केंद्राच्या भगीरथी निवास, सिव्हील लाईन, वाशिम येथील कार्यालयात करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




