31.3 C
Gondiā
Thursday, June 18, 2026
Home गुन्हेवार्ता अवैध वाळू भरलेले दोन ट्रॅक्टर जप्त

अवैध वाळू भरलेले दोन ट्रॅक्टर जप्त

0
64

मोहाडी,दि.24ः-तालुक्यातील रोहा येथील वैनगंगा नदी घाटावरून अवैध रेती उत्खनन करून रोहा ग्रामपंचायतच्या मागील खोलगट भागात अवैध रेती भरून दोन ट्रॅक्टर उभे असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने कारवाई करून दोन ट्रॅक्टर जप्त करून मोहाडी पोलिस स्टेशनला जमा केले आहे.
पोलिस निरीक्षक निशांत मेश्राम हे पोलिस स्टेशन मोहाडीला हजर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, मौजा रोहा घाटातून अवैध रेती उत्खनन करून दोन ट्रॅक्टर रोहा ग्रामपंचायतच्या मागील खोलगट भागात उभे करून ठेवण्यात आले आहेत. या माहितीवरून पोलिस निरीक्षक निशांत मेश्राम यांनी तहसीलदार मोहाडी यांना माहिती दिली असता त्यांनी तलाठी व्हीं. आर. ठाकरे व कोतवाल चंद्रकुमार नंदनवार यांना पोलिसांसोबत देऊन रोहा ग्रामपंचायतच्या मागे खोलगट भागत कार्यवाही केली. त्यावेळी एक विना नंबरचा ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये रेती भरून असलेला आढळला. व दुसरा ट्रॅक्टर हनुमान मंदिराच्या बाजूला रेती भरून असलेला आढळला असता, सदर ट्रॅक्टरचा तलाठ्यांनी पंचनामा करून मोहाडी पोलिस स्टेशनला दोन्ही ट्रॅक्टर जमा करण्यात आले.
पुढील कार्यवाहीसाठी ठाणेदार मेर्शाम हे तहसीलदार मोहाडी यांच्याशी पत्रव्यवहार करीत आहेत. मोहाडी तालुक्यातील अनेक वाळू घाटातून अवैध वाळू चोरुन नेणार्‍या वाहनांवर कारवाई केली जाते. मात्र मागील दोन वर्षापासून खुलेआम मोहगाव टोली येथे सुरनदीच्या किनार्‍यावर बाबू वाघमारे यांच्या शेतात अवैध वाळू व्यवसाय सुरू आहे. त्या ठिकाणी कारवाई केल्या जात नाही. आजही त्याठिकाणी दोन हजार ब्रास वाळू जमा आहे. याकडे महसूल विभाग व पोलिस अधिकार्‍यांचे पूर्णत: दुर्लक्ष आहे.